AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान आर्थिक संकटात, पाहा कोणावर आली 3 इंचचे सँडविच विकण्याची वेळ

Pakistan inflation rate : पाकिस्तानातील स्थिती सध्या वाईट आहे. कारण येथे सर्वसामान्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पैशांसाठी लोकं वणवण भटकत आहेत. महागाईचा दर वाढतच चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

पाकिस्तान आर्थिक संकटात, पाहा कोणावर आली 3 इंचचे सँडविच विकण्याची वेळ
| Updated on: Oct 03, 2023 | 2:58 PM
Share

Pakistan face financial crisis : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानमध्ये महागाई दररोज वाढत चालली आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईचा सामना करण्यासाठी लोकांकडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे लोकं आर्थिक विवंचनेत आहेत. अशातच आता पाकिस्तानमध्ये एका प्रसिद्ध फूड चेन रेस्टॉरंटवर सँडविच विकण्याची सक्ती केली जात आहे. या फूड चेनमध्ये जगभरात कुठेही तीन इंची सँडविच विकले जात नाहीत, परंतु पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे तीन इंच सँडविच बाजारात आणणे भाग पडले आहे.

पाकिस्तानला महागाईचा फटका

पाकिस्तानात महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात ३१.४ टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्टमध्ये तो 27.4 टक्क्यांवर होता. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानला IMF ने गेल्या जुलैमध्ये तीन अब्ज डॉलर्सचे पॅकेज देऊन वाचवले. IMF ने पाकिस्तानवर अनेक कठोर अटी लादल्या आहेत, त्यापैकी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याची अट होती. त्यामुळे पाकिस्तान सरकारने तेलाच्या किमती वाढवल्या आणि परिणामी मे महिन्यात विक्रमी ३८.० टक्के महागाई दर झाला. तिथला व्याजदरही 22 टक्क्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.

पाकिस्तानी रुपयाची घसरण

पाकिस्तानी रुपयाची घसरण सुरुच आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीही वाढल्या आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये नीचांकी पातळी गाठल्यानंतर सप्टेंबरमध्ये पाकिस्तानी रुपयाची स्थिती थोडी सुधारली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, येत्या काही महिन्यांत चलनवाढीचा दर 29-31 टक्क्यांच्या आसपास राहील आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला त्यात काहीसा दिलासा मिळू शकेल.

पाकिस्तानात सर्वसामान्यांचे हाल

पाकिस्तानातील जनता आधीच त्रस्त होती, आता वाढत्या महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानमध्ये तेल आणि वायू नियामक प्राधिकरणाने एलपीजीच्या किमतीत 20.86 रुपये प्रति किलोने वाढ केली आहे, त्यानंतर तिथे एलपीजी 260.98 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरची किंमत 3079.64 रुपये झाली आहे.

IMF देणार पाकिस्तानला भेट

पाकिस्तानातील आर्थिक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आयएमएफचे एक शिष्टमंडळ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानला भेट देणार असल्याची माहिती आहे. IMF चा 700 दशलक्ष डॉलरचा पुढील हप्ता आर्थिक आढावा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतरच पाकिस्तानला दिला जाईल. IMF ने पाकिस्तानला तीन अब्ज डॉलर्सचे आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत पाकिस्तानला १.२ अब्ज डॉलर्स मिळाले आहेत. उर्वरित रक्कम पाकिस्तानला हप्त्यांमध्ये येईल, ज्यासाठी पाकिस्तान सरकारला IMF च्या सूचनेनुसार आपल्या अर्थव्यवस्थेत बदल करावे लागतील.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.