खोटारड्या पाकिस्तानातून भारतावर मोठं संकट, शत्रूला पुरवलं जातंय बळ; शाहबाजचा खरा चेहरा समोर!
पाकिस्तानी सरकारने या दहशतवादाला खतपाणी घालणे सोडून द्यावे, असे भारताने अनेकवेळा सांगूनही पाकिस्तानचे शासनकर्ते, पाकिस्तानी लष्करात काहीही फरक पडलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. पण तरीदेखील आपल्या शेजारील राष्ट्रातील विघातकी विचार संपलेले नाहीत. दरम्यान, आता पाकिस्तानातून भारताची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पुन्हा एकदा बळ पुरवण्याचं काम तिथे केले जात आहे.

India Vs Pakistan : जम्मू काश्मीरमधील सीमेजवळील भागात अशांतता राहावी यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना नेहमीच काहीतरी कुरापती करत असतात. पाकिस्तानी सरकारने या दहशतवादाला खतपाणी घालणे सोडून द्यावे, असे भारताने अनेकवेळा सांगूनही पाकिस्तानचे शासनकर्ते, पाकिस्तानी लष्करात काहीही फरक पडलेला नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं होतं. पण तरीदेखील आपल्या शेजारील राष्ट्रातील विघातकी विचार संपलेले नाहीत. दरम्यान, आता पाकिस्तानातून भारताची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पुन्हा एकदा बळ पुरवण्याचं काम तिथे केले जात आहे.
नेमकी काय माहिती समोर आली?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून जैस ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेला बळ पुरवलं जात आहे. ही संघटना आता आपल्याकडे अत्याधुनिक शस्त्रं कसे येतील याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत आयएसआयदेखील जैस ए मोहम्मदला साथ देत आहे. आता ही संघटना पारंपरिक शस्त्र वगळून क्वॉडकॉप्टर, ड्रोन जमवण्याचा प्रयत्न करत आहे.
जैशच्या कामाची पद्धत कशी आहे?
या सर्व मोहिमेत पाकिस्तानी लष्कार दहशतवाद्यांना साथ देत आहे. पाकिस्तानी लष्कर जैशच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. जैश मिळालेल्या देणगीतून साधारण 50 टक्के रक्कम शस्त्र खरेदी करण्यावर खर्च करते. असे असताना पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी सेनेकडून या संघटनेला मिळत असलेली मदत भारताची चिंता वाढवू शकते.
कोणकोणती शस्त्रं खरेदी केली जात आहेत?
आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या मदतीने जैश ए मोहम्मदकडून काळ्या बाजारात मशीन गन, रॉकेट लॉन्चर्स आदी शस्त्र खरेदी केले जात आहेत. पाकिस्तानातील या सर्व घडामोडी पाहून हा देश भारताविरोधात आपले मोठा कट तर रचत नाहीये ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भारताची नेमकी तयारी काय?
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानातील दहशतवादी कारवायांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कुरापती करण्यासाठी ही जमवाजमव असल्याचे बोलले जात आहे. हे जर खरे असेल तर भविष्यात नेमकं काय घडणार? भारताची या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी कोणती तयारी आहे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
