सर्चमध्ये भलतीचं उत्तरं, गुगलला कोर्टात खेचण्याच्या पाकिस्तानच्या हालचाली

पाकिस्तानमध्ये (Pakistan) गुगलला (Google) कोर्टात खेचण्याच्या हालचाली सुरु आहेत. लाहोर उच्च न्यायालयात (Lahore High Court) अमेरिकन कंपनी गुगलविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत विचार सुरु आहे.

सर्चमध्ये भलतीचं उत्तरं, गुगलला कोर्टात खेचण्याच्या पाकिस्तानच्या हालचाली
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 3:30 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) गुगलला (Google) कोर्टात खेचण्याच्या हालचाली सुरु आहेत. लाहोर उच्च न्यायालयात (Lahore High Court) अमेरिकन कंपनी गुगलविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत विचार सुरु आहे. पाकिस्तानमधील गुगल सर्चमध्ये ईश्वरनिंदा (blasphemy) करणारी माहिती येत असल्याचा आरोप होत आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद कासिम खान यांनी याविरोधात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने पाकिस्तान सरकारच्या केंद्रीय तपास संस्थेला (Federal Investigation Agency) गुगल विरोधात गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत का? अशी विचारणा केली आहे (Pakistan Lahore High Court thinking on register of FIR against Google).

वकिल अजहर हसीब यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही विचारणा केलीय. या याचिकेत हसीब यांनी सरकारकडे गुगलच्या डेटाबेसमुळे सर्चमध्ये येणारी माहिती बदलण्याची मागणी केलीय. यात म्हटलं आहे, “गुगलवर इस्लाम विरोधात सर्च केल्यानंतर अहमदी समुदायाच्या नेत्यांचं नाव दाखवलं जातंय. पाकिस्तान सरकार ही माहिती गुगलवरुन हटवण्यात अपयशी ठरलीय.” या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी FIA चे अनेक अधिकारी देखील उपस्थित होते.

पाकिस्तान सरकारने आपली जबाबदारी स्वीकारली

न्यायालयाने विचारणा केल्यानंतर पाकिस्तान सरकारच्या वतीने हजर असलेल्या डेप्युटी अॅटोर्नी जनरल यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली. ते म्हणाले, “इंटरनेटवर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह किंवा ईश्वरनिंदा संबंधित माहितीविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी सरकारच्या FIA ची आहे.” यावेळी मुख्य न्यायाधीशांनी पाकिस्तानमधील सध्याची स्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचं मत नोंदवलं. पाकिस्तानमध्ये मुलभूत जबाबदाऱ्या देखील पूर्ण होत नाहीये. येथे नेमकं कशाप्रकारचं सरकार आहे? असा सवाल करत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

‘ईश्वरनिंदेविरोधात कारवाईसाठी स्वतंत्र शाखा सुरु करा’

लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या याचिकेवर सुनावणी करताना अशा प्रकारच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एफआयएला वेगळी शाखा सुरु करण्यास सांगितले. तसेच ईश्वरनिंदा करणारा देशाबाहेर असेल तर त्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार एफआयएला आहेत का? अशीही विचारणा न्यायालयाने केली. जर गुगलवरुन आक्षेपार्ह माहिती न हटल्यास गुगलविरोधात गुन्हा दाखल करता येईल का? याबाबतही न्यायालयाने विचारणा केली.या प्रकरणी पुढील सुनावणी बुधवारी (30 डिसेंबर) होणार आहे.

हेही वाचा :

Google | कुठून देतो ‘गुगल बाबा’ तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर, जाणून घ्या या मागचं रहस्य…

नववर्षात Google Stadia मध्ये चार नव्या गेमचा समावेश, किंमत काय?

Google Pixel 6 मध्ये खास अंडर डिस्प्ले कॅमरा दिसणार? स्मार्टफोनच्या पेटंट डिझाईनची जोरदार चर्चा

Pakistan Lahore High Court thinking on register of FIR against Google

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.