लाहोर : पााकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखपदी म्हणजेच सरन्यायाधीशपदी एका महिलेची वर्णी लागणार आहे. न्यायमूर्ती आयशा मलिक असं या पाकिस्तानी महिलेचं नाव आहे. पाकिस्तानचे मावळत्या सरन्यायाधीश मुशीर आलम यांनी सुप्रिम कोर्टातील पदोन्नतीसाठी आयशा मलिक यांच्या नावाची शिफारस केलीय. मुशीर आलम 17 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानची एक न्यायालयीन समिती आयशा मलिक यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखपदासाठी विचार करत आहे.