Explained : पाकिस्तानला जगातले कुठले-कुठले देश भीक देतात? त्यांच्या उपकारावरच जगतो हा देश
पाकिस्तान नुकताच सौदी अरेबियासोबत झालेल्या करारामुळे चर्चेत आहे. पाकिस्तानची स्वत:ची क्षमता नाहीय. त्यामुळे जगातल्या अनेक देशांचे उपकार घेऊन पाकिस्तानला जगावं लागतय. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकप्रकारे पाकिस्तानचा वापर होतो.

पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये नुकत्याच झालेल्या सुरक्षा कराराची सगळीकडे चर्चा आहे. NATO सारखा हा करार आहे. या करारानंतर असं म्हटलं जातय की, पाकिस्तान सौदी अरेबियाचा पैसा वापरुन आपल्या देशाच सैन्य मजबूत बनवेल. पण पाकिस्तानने असं करण्याची ही पहिली वेळ नाहीय. पाकिस्तानचे अनेक देशांसोबत सैन्य संबंध आहेत. पाकिस्तान या देशांसोबत सैन्य कराराच्या नावाखाली भरपूर पैसा वसूल करतो.
पाकिस्तानने अमेरिका, UAE, चीन, ओमान, अजरबैजान, मलेशिया, इंडोनेशिया आणि तुर्की या देशांसोबत अनेक सैन्य करार केले आहेत. त्या आधारे पाकिस्तान जागतिक स्तरावर आपली पकड मजबूत करतो आणि सैन्य सुरक्षेच्या नावाखाली त्या देशांकडून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतो.
जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र पीसकीपर फोर्सच्या बहाण्याने सूदान, कांगो, लिबेरिया आणि बुरुंडी आदि देशात आपलं सैन्य पाठवलं आहे. UN कडूनही त्यांनी फायदा पदरात पाडून घेतलाय. पाकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना आहे. पाकिस्तानचा परदेशातील सैन्य उपस्थितीचा एक व्यापक इतिहास राहिला आहे, खासकरुन मध्यपूर्वेत. त्या देशात पाकिस्तानच्या सैन्य तुकड्या, मशिन आणि बटालियन आहेत. पाकिस्तानने अन्य देशांसोबत केलेल्या काही मोठ्या करारांवर नजर टाकूया.
सौदी अरेबियासोबतच्या करारात काय?
पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने 17 सप्टेंबरला एक महत्वपूर्ण सैन्य करार स्ट्रॅटेजिक म्यूचुअल डिफेंस एग्रीमेंट (SMDA) साइन केलं. या कराराला म्यूचुअल डिफेंस पॅक्ट म्हटलं जातय. या करारातंर्गत कुठल्या एकादेशावर हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. दोन्ही देशांच सैन्य परस्पराला वाचवण्यासाठी मदत करेल. या करारातंर्गत दोन दशकं जुन्या सुरक्षा सहकार्य कराराला एक औपचारिक रुप देण्यात आलय. सौदी अरेबियाचा पैसा वापरुन पाकिस्तान आपलं सैन्य अधिक मजबूत बनवेल.
चीनसोबत पाकिस्तानचा काय करार?
चीन आणि पाकिस्तानमधील सैन्य संबंधांकडे सहाबहार मैत्रीच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. 1950 पासून हे संबंध आहेत. भारत आणि अमेरिकेच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी चीन-पाकिस्तानची ही मैत्री आहे. दोन्ही देशांमध्ये कुठला औपचारिक सैन्य करार नाहीय. पण द्विपक्षीय करार, शस्त्रास्त्रांचे सौदे, जॉइंट ड्रील आणि तंत्रज्ञान सहकार्य सुरु आहे. पाकिस्तान सर्वात जास्त शस्त्र चीनकडून विकत घेतो. वर्ष 2019-2023 दरम्यान पाकिस्तानने 82 टक्के शस्त्र चीनमधून आयात केली. चीनने CPEC अंतर्गत पाकिस्तानसोबत सुरक्षा सहकार्य वाढवलं आहे. त्यांनी पाकिस्तानला स्वस्तात शस्त्र विकली.
अमेरिकेसोबत काय सैन्य करार?
अमेरिकेने 9/11 नंतर पाकिस्तानसोबत अनेक सैन्य करार केले. चीनचा वाढता प्रभाव आणि सेंट्रल आशियावर वर्चस्व ठेवण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेसाठी महत्वाचा देश आहे. अमेरिका पाकिस्तानला वर्षाला जवळपास 500 मिलियन डॉलरची आर्थिक सहाय्यता देतो. अमेरिकेने पाकिस्तानी सैन्याला F-16, AH-1Z हेलीकॉप्टर, हार्पून मिसाइल्स दिली आहेत.
तुर्कीसोबत काय करार?
तुर्की आणि पाकिस्तानमध्ये दृढ संबंध आहेत. 1950 पासून दोन्ही देशांमध्ये क्षेत्रीय सुरक्षा, सैन्य व्यापार आणि संयुक्त अभ्यास यावर संबंध आधारित आहेत. तुर्की पाकिस्तानचा दुसरा मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. दोन्ही देश ‘तीन भाई’ अंतर्गत अजरबैजानचा मदत करतात.
पाकिस्तानला तुर्कीकडून Bayraktar TB2 ड्रोन्स, T-129 ATAK हेलीकॉप्टर मिळाली आहेत तसच दोन्ही देशांचे सैन्य वेळोवेळी एकत्र युद्धसराव करतं.
