Pakistan PM Imran Khan Video : इम्रान खान यांच्याकडून भारताचं कौतुक! भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान?

इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलंय. भारताचं परराष्ट्र धोरण जनतेच्या हिताचं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण कुणाच्याही दबावाखाली नाही. त्यामुळे मी भारताच्या धोरणाचं कौतुक करतो, अशा शब्दात इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.

Pakistan PM Imran Khan Video : इम्रान खान यांच्याकडून भारताचं कौतुक! भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले पाकिस्तानचे पंतप्रधान?
इम्रान खानImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 5:08 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. इम्रान खान (Imran Khan) यांचं सरकार धोक्यात असल्याच्या चर्चा सध्या पाकिस्तानात सुरु आहे. खुद्द इम्रान खान यांना सरकार पडण्याबाबत भीती सतावतेय. अशावेळी इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलंय. भारताचं परराष्ट्र धोरण (India’s foreign policy) जनतेच्या हिताचं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण कुणाच्याही दबावाखाली नाही. त्यामुळे मी भारताच्या धोरणाचं कौतुक करतो, अशा शब्दात इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे इम्रान खान यांनी आपल्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. विरोधी पक्षाची भारताशी युती आहे. विरोधक डाकू आहेत. मी राजीनामा देईन, पण कुणापुढे झुकणार नाही, असं खान म्हणाले. मला पैसे देऊन सरकार वाचवायचं नाही, असंही खान यांनी म्हटलंय.

दरम्यान, इम्रान खान यांचं सरकार कधीही कोसळू शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तानात इम्रान खान यांच्या पक्षाचेच खासदार बंड करुन त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. अशावेळी खान यांची खुर्ची कधीही जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

इम्रान खान यांच्याकडून भारताचं कौतुक!

2 डझन खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं!

पाकिस्तानात सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे जवळपास 2 डझन खासदारांनी बंड पुकारल्याचं समजतंय. विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय. अशावेळी विरोधक घोडेबाजार करुन सत्ताधारी पक्षाचे खासदार फोडट असल्याचा आरोप केलाय. पीटीआयचे बंडखोर खासदार सध्या सिंध सरकारची मालमत्ता असलेल्या इस्लामाबादेतील सिंध हाऊसमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती मिळतेय. सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीचं सरकार आहे.

खासदारांना कारणे दाखवा नोटीस

पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने शनिवारी पक्षांतराच्या आरोपावरुन नाराज असलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर त्यांना 26 मार्चपर्यंत स्पष्टीकरण देण्यासही बजावण्यात आलंय. त्यात पक्षांतरबंदी कायद्यानुसार तुम्हाला नॅशनल असेम्ब्लीच्या सदस्यत्वासाठी अपात्र का करण्यात येऊ नये? अशी नोटीस देण्यात आलीय.

इतर बातम्या :

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार, गुलाम नबी आझाद यांचा दावा

SP MLC Candidates: सपाचा पुन्हा उत्तर प्रदेशात MY फॉर्म्यूला, सब कुछ यादव, दाखवायला दोन मुस्लीम?

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.