पाकिस्तानच्या असीम मुनीरचं राक्षशी बळ वाढलं, एका निर्णयानं जनरल महाबलवान; नेमकं काय घडतंय?
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर याला अमर्याद शक्ती मिळाली आहे.

Pakistan General Asim Munir : पाकिस्तानात लष्कराला फार महत्त्वाचे स्थान आहे. कोणताही राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर तेथील सत्ताधारी लष्कराची बाजू जाणून घेतातच. असे असतानाच गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने वेगवेगळ्या मार्गाने बळ पुरवलेलं आहे. पाकिस्तानी लष्कराकडे अनेक अधिकार आले आहेत. असे असतानाच आता तेथील सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे पाकिस्तानी लष्कराचा जनरला महाबलशाली होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे नागरिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.
नेमका निर्णय काय घेतला आहे?
पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने 7 मे रोजी एक मोठा आदेश दिला होता. या आदेशानुसार यापुढे तेथे सामान्य नागरिकांवर लष्करी न्यायालयात खटले भरले जाऊ शकतात. म्हणजेच सामान्य नागरिकांविरोधात कोर्ट मार्शलचा निर्णय घेतला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी लष्कर तसेच लष्काराचा प्रमुख असीम मुनीर याला मोठी ताकद मिळाली आहे. पण या निर्णयामुळे लोकशाही समर्थक, सामान्य नागरिक यांना मात्र हा निर्णय अडचणीचा ठरू शकतो.
..म्हणून घेण्यात आला निर्णय
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या समर्थकांनी 9 मे 2023 रोजी मोठे प्रदर्शन केले होते. यामुळे पाकिस्तानात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली होती. या काळात इम्रान खान यांच्या अनेक समर्थकांना लष्कराने तसेच तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याच लोकांना शिक्षा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय दिल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे मात्र सामान्य नागरिकही भरडले जाऊ शकतात.
निर्णयावर होत आहे टीका
पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. या लेखात पाकिस्तानतीली प्रसिद्ध वकील रिदा हुसैन यांनी म्हटलंय की, हा निर्णय घेतल्याने पाकिस्तानी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत आहे. हा पाकिस्तानी संविधानाचा पराभव आहे.
पाकिस्तानी मीडियानेही या निर्णयावर टीका केली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा अयुब खान यांच्यासारखा काळ येण्याची भीती येथे व्यक्त करण्यात आली आहे. अयुब खान यांच्या काळात नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले होते. तेथे नागरिकांचे कोर्ट मार्शल केले जायचे.
पाकिस्तानात भविष्यात काय होणार?
दरम्यान, पाकिस्तानी लष्कर अधिकारी असीम मुनीर हा पाकिस्तानचा पराराष्ट्र धोरण तसेच राजकीय निर्णय यामध्ये हस्तक्षेप करत असतो, असे असताना त्याला तसेच लष्कराला आणखी अधिकार मिळाले आहेत. या निर्णयानंतर पाकिस्तानात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
