दोन रेल्वे सुसाट वेगाने एकाच ट्रॅकवर, भीषण धडकेत 30 प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी बोगीतच अडकले

मिल्लत एक्स्प्रेस (Millat Express) आणि सर सय्यद एक्स्प्रेस  (Sir Sayyed Express) या दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्याने त्यांची भीषण धडक झाली. यामध्ये आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दोन रेल्वे सुसाट वेगाने एकाच ट्रॅकवर, भीषण धडकेत 30 प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी बोगीतच अडकले
Pakistan train accident
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 12:04 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानात आज सकाळी भीषण रेल्वे दुर्घटना घडली. (Pakistan train accident) दोन ट्रेनची समोरासमोर धडक झाल्याने तब्बल 30 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत. सिंध प्रांतातील डहारकीजवळ ही भीषण दुर्घटना घडली. मिल्लत एक्स्प्रेस (Millat Express) आणि सर सय्यद एक्स्प्रेस  (Sir Sayyed Express) या दोन रेल्वे एकाच ट्रॅकवर आल्याने त्यांची भीषण धडक झाली. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अनेक लोक अजूनही रेल्वे बोगीत अडकले आहेत.

नेमकं काय घडलं?

पाकिस्तानी वृत्तवाहिनी जियो टीव्हीनुसार, मिल्लत एक्स्प्रेस अनियंत्रित झाल्याने तिचे डबे दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर गेले. त्याचवेळी दुसऱ्या ट्रॅकवरुन सय्यद एक्स्प्रेस जात होती. त्यावेळी ही भीषण धडक झाली. या अपघातात मिल्लत एक्स्प्रेसचे 8 आणि सय्यद एक्स्प्रेसच्या इंजिनसह चार डबे ट्रॅकवरुन उतरले. या अपघातात जवळपास 50 प्रवासी गंभीर जखमी आहेत.

मिल्लत एक्स्प्रेस कराचीवरुन सरगोधाला तर सय्यद एक्स्प्रेस रावळपिंडीवरुन कराचीला जात होती. त्यादरम्यान पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला.

दरम्यान, या अपघाताच्या तब्बल चार तास उलटूनही पाकिस्तानी अधिकारी घटनास्थळी पोहोचलेच नाही. त्यामुळे मदत आणि बचावकार्यही सुरु झालं नसल्याने, अनेक जखमी प्रवाशांचा तडफडून मृत्यू झाला.

अनेक प्रवासी असे काही अडकले आहेत की ट्रेनचे डबे कापून त्यांना बाहेर काढण्याशिवाय पर्याय नाही. जे प्रवासी जखमी आहेत, त्यांना ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विट

संबंधित बातम्या 

गुगल, फेसबुक सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका, जी -7 देशांमध्ये 15 टक्के वैश्विक करावर ऐतिहासिक करार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.