AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल, फेसबुक सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका, जी -7 देशांमध्ये 15 टक्के वैश्विक करावर ऐतिहासिक करार

बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून त्या त्या देशात कंपन्यांचं छोटं युनिट दाखवून होत असलेल्या कर चुकवेगिरीवर उपाय म्हणून जी 7 देशांनी अनेक वर्षांच्या चर्चेनंतर ऐतिहासिक करार केलाय.

गुगल, फेसबुक सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका, जी -7 देशांमध्ये 15 टक्के वैश्विक करावर ऐतिहासिक करार
google and facebook
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 3:03 AM
Share

वॉशिंग्टन : बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कमी कर असलेल्या देशात कंपन्यांचं छोटं युनिट सुरू करन होणाऱ्या कर चुकवेगिरीवर उपाय म्हणून जी 7 देशांनी अनेक वर्षांच्या चर्चेनंतर ऐतिहासिक करार केलाय. यानुसार गुगल, फेसबुक, अमेझॉन अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नफ्यावर 15 टक्के कर निश्चित करण्यात आलाय. त्यामुळे कर चुकवेगिरी करणाऱ्या सर्वच कंपन्यांना हा मोठा झटका आहे. जी 7 शिखर परिषदेत या कराराला अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या अध्यक्षतेखाली 11 ते 13 जून दरम्यान कॉर्नवॉल येथे ही शिखर परिषद होणार आहे (G7 nations agreement on worldwide universal tax on multinational companies like Facebook Google etc).

कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांनी हा 15 टक्के वैश्विक कराचा करार केलाय. यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कमी कर असलेल्या देशांमध्ये आपल्या शाखा सुरू करुन होणारी करचुकेवगिरी रोखली जाणार आहे.

हा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कारण बायडन यांनी निवडणुकीत त्यांचं सरकार आल्यास कॉर्पोरेट कर वाढवू असं आश्वासन दिलं होतं. विशेष म्हणजे अमेरिकेतील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कमी कर असलेल्या देशांमधून आपलं काम करण्याला प्राधान्य देत होत्या. मात्र, वैश्विक पातळीवर एकच कर निश्चित करण्याच्या या करारामुळे अमेरिकेतून बाहेर देशांमध्ये जाणाऱ्या कंपन्यांमध्ये घट होईल, असाही आशावाद अमेरिकेकडून व्यक्त केला जातोय.

फेसबुक ट्विटरवर भारतात निर्बंध

दरम्यान, मागील काही दिवसांपासून फेसबूक, ट्विटर या सोशल मीडिया कंपन्या आणि भारत सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. मोदी सरकारकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आपल्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप होतोय. दुसरीकडे सरकारने संबंधित सोशल मीडिया कंपन्या कायद्यांचं पालन करत नसल्याचं सांगत कारवाईचा इशारा दिलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या इंटरमिजिएट मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता 2021 च्या नियमांनुसार मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क व्यक्ती आणि तक्रार निवारण अधिकारी यांचे तपशील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे पाठवले आहेत. मात्र, ट्विटरकडून अद्याप यावर प्रतिसाद मिळालेला नाही.

हेही वाचा :

अमेरिकेतून फेसबुक अधिकाऱ्यांचा फोन, आत्महत्येचा ‘लाईव्ह’ प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं

‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

केवळ अधिकाऱ्यांच्या नेमणुकीने प्रश्न सुटणार नाहीत, सरकारी नियमांचे पालन करावेच लागेल; हायकोर्टाने Twitter ला सुनावलं

व्हिडीओ पाहा :

G7 nations agreement on worldwide universal tax on multinational companies like Facebook Google etc

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.