‘अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा’, जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनवलेल्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Accused create fake Facebook account of Akola Collector Jitendra Papalkar and demanding money)

'अर्जंट 12 हजारांची आवश्यकता आहे, Google Pay ने पैसे पाठवा', जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन पैशांची मागणी
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 7:57 PM

अकोला : फेक अकाउंटद्वारे लोकांना फसवणे हा काही नवीन प्रकार नाही. आपण जर बघितलं तर असे अनेक प्रकार आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. पण याचा फटका चक्क अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. हे ऐकून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता शहरात अनेकांची चिंता वाढली आहे (Accused create fake Facebook account of Akola Collector Jitendra Papalkar and demanding money).

फेक अकाउंटवरुन माजी महापौरांच्या चिरंजीवांना मेसेज

आरोपीने अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर त्या फेक अकाउंटवरून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. याबाबत अखिलेश हातवळणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलीस यंत्रणा चौकशी करीत आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचं फेक फेसबुक अकाउंट बनवून पैसे मागणीचा प्रकार अकोल्यात पहिल्यांदा घडला आहे.

आरोपीकडून 12 हजारांची मागणी

सोशल मीडियावर अनेकदा आपण फेक अकाउंटबद्दल ऐकले वाचले असेल. मात्र, अकोल्यात चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेसबुक अकाउंट बनवून त्याद्वारे पैशांची मागणी करण्यात येत आहे. यासाठी बनावट अकाउंटधारक मॅसेंजरवर चॅटींग करून फसवणूक करीत असल्याचे लक्षात आलं आहे. आरोपी गुगल पे अकाउंटद्वारे पैशांची मागणी करतो. पैशांची अर्जंट गरज असून 12 हजार रुपये द्या, असं आरोपी सांगतो. आरोपी यासाठी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी गुगल अकाउंटचा क्रमांकही देतो.

सायबर क्राईमपासून सावध राहा

आता तुम्हीपण सावध रहा. तुम्ही देखील फेसबुकचा वापर करतायना? मग फेसबुकवर आलेली अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारणे हे धोक्याचे ठरू शकते. कारण सध्या फेसबुकवर फेक अकाउंट्सचा सुळसुळाट सुटला आहे. चक्क अकोल्याचे जिल्हाधिकारी यांना याचा फटका बसला आहे. फेक अकाऊंट कसे ओळखायचे, त्याचबरोबरच फेक अकाउंटमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून सावध कसे राहावे, याची आधी खात्री करून घेतली पाहिजे. नाहीतरी तुम्ही देखील याचा शिकार होऊ शकता (Accused create fake Facebook account of Akola Collector Jitendra Papalkar and demanding money).

हेही वाचा : नग्न व्हिडीओ फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी, पुण्यात 150 हून अधिक तरुण जाळ्यात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.