
Bedroom Jihad : जम्मू आणि काश्मीरमधील वातावरण अशांत ठेवण्यासाठी पाकिस्तानमधून नेहमीच कुरापती केल्या जातात. पाकिस्तानचे सैनिक कधी जम्मू-काश्मीरवर गोळीबार करतात. तर कधी सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवले जातात. सध्या पाकिस्तानमध्येच अनेक दहशवतवादी संघटनांनी डोके वर काढलेले आहे. आपल्याच प्रदेशातील अशाांतता निस्तारताना पाकिस्तानचे नाकी नऊ येतात. असे असले तरी या देशाकडून जम्मू-काश्मीरच्या लोकांना भडकवण्यासाठी नवा कट रचला जातोय. पाकिस्तानकडून आता बेडरूम जिहादचा वापर केला जात असून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानधून काश्मीरमध्ये बेडरुम जिहादच्या माध्यमातून तरुणांना भडकवण्याचे काम केले जात असल्याचे समोर आले आहे. काश्मीरमधील काऊंटर इंन्टेलिजन्स विंगच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे. या माहितीनुसार पाकिस्तानातील दहशतवादी हे तिथून काश्मरीमधील तरुणांचा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न करत आहेत. यालाच आता बेडरुम जिहाद म्हटले जात आहे. या बेडरुम जिहादच्या माध्यमातून काश्मीरमधील तरुणांना भारताविरोधात भडकवले जात आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
बेडरुम जिहादच्या माध्यमातून पाकिस्तानमधून कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने फेक व्हिडीओ, फोटो तयार केले जात आहेत. तेच व्हिडीओ, फोटो काश्मीरमध्ये पाठवले जातात. विशेष म्हणजेच काश्मरीमधील तरुणांचे माथे भडकवण्यासाठी वेगवेगळ्या अॅप्सचा वापर केला जातोय. विशिष्ट प्रकारच्या या अॅप्सना ट्रॅक करणेही अवघड अवघड असते. पाकिस्तानातून पुरवली जाणारी ही माहिती काश्मीरचे तरुण घरात आपल्या बेडरुममध्ये बसूनही पाहू शकतात. त्यामुळेच या कटाला बेडरुम जिहाद म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या सर्व षडयंत्राचा मास्टरमाईंड अब्दुल्ला गाझी हा आहे. हा दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथे राहून तो हे नेटवर्क चावलतो. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय या संघटनेकडूनही या टेटर मोड्यूलला चालवले जाते असे म्हटले जाते. त्यामुळे भारत आता या नव्या बेडरुम जिहादशी कसा सामना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.