AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो पाणी अडवेल, त्याचे हात कापू… सिंधू जल करारावरून पाकिस्तानी मंत्र्यांच्या वल्गना, भारताला..

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, तसंच सिंधू जल करार स्थगित केला. यामुळे पाकिस्तान पाण्यासाठी तडफडत आहे. या हताशेतूनच पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी सिंधू पाणी वाटपावरून भारताला पोकळ धमक्या दिल्या आहेत. भारताच्या कणखर भूमिकेने पाकिस्तानची कोंडी झाली असून, हा पाणी वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. (58 words)

जो पाणी अडवेल, त्याचे हात कापू... सिंधू जल करारावरून पाकिस्तानी मंत्र्यांच्या वल्गना, भारताला..
पाकिस्तानी मंत्र्याच्या पोकळ वल्गना
| Updated on: Jun 30, 2026 | 11:01 AM
Share

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आलाय. गेल्या वर्षी पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या भ्याड, नृशंस हल्ल्यात अनेक भारतीयांचा बळी गेला. यानंतर भारताने ऑपेरशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्या. आणि पाकविरुद्धही कठोर भूमिका घेत ऐतिहासिक सिंधु जल करार स्थगित करत पाकचं पाणी रोखलं. यामुळे पाकिस्ताना पाण्यासाठी तडफडत असून त्यांची अक्षरश: कोंडी झाली आहे. भारताच्या या पावलामुळे पाकिस्तान प्रचंड संतापलेला आहे आणि वारंवार भारताला पोकळ धमक्या देत आहे.

‘सिंधू जल करारा’बाबत कोणतीही प्रभावी कारवाई करण्यास असमर्थ ठरल्यामुळे निर्माण झालेल्या हताशेतून पाकिस्तान अशी आक्रमक प्रतिक्रिया देत आहे. म्हणूनच, सिंधू पाणी वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. पाकिस्तानचे मंत्री मुसादिक मलिक यांनी संतापाच्या भरात भारताला उघड धमकी दिली आहे. सिंधू जल करारानुसार असलेल्या पाकिस्तानच्या वाट्यावर जो कोणी हक्क सांगण्याचा प्रयत्न करेल, त्यांचे ‘हात तोडून टाकू’, अशी धमकी मुसादिर यांनी दिल्याचे पाकिस्तानी मीडियाने नमूद केलं आहे. .

अनेक दशकं जुन्या ‘सिंधू जल करारा’बाबतचा तणाव वाढलेला असतानाच आता पाकिस्तानच्या मंत्र्याचे हे विधान आलं आहे. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. तसंच, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने सिंधू जल करार रद्द केला. तेव्हापासून पाकिस्तानकडून पाणी प्रश्नावरून आरडाओरडा सुरू आहे.

पाकिस्तानी मंत्र्यांच्या पोकळ वल्गना

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांच्यासमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री मुसादिक मलिक यांनी, भारत हा पाणीपुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. यावेळी तणावात असलेल्या मुसादिक यांनी भारताला पोकळ धमकी दिली. इस्लामाबादच्या पाणीविषयक हक्कांना धोका निर्माण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.

काय म्हणाले मुसादिक मलिक ?

‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानी मंत्री मलिक यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान सिंधू जल कराराचा उल्लेख केला. यावेळी त्यांनीपोकळ वल्गना करत भारताला धमकी दिल्याचं दिसून आलं. ” शेजारील देशाच्या पंतप्रधानांच्या हातात त्या नळाचं नियंत्रण आहे. ते म्हणतात की, पाकिस्तानात पाण्याचा एक थेंबहीवाहू देणार नाहीत.” त्यानंतर, मलिक यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत कडक इशारा दिला. “आमच्या हक्काच्या पाण्यावर कोणी दावा केला तर ते हात आम्ही छाटून टाकू. ” असं ते म्हणाले.

त्यांच्या विधानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असले, तरी त्यांची पुष्टी होऊ शकलेली नाही. ‘सिंधू जल करारा’अंतर्गत पाकिस्तान आपल्या हक्काच्या पाण्याचे रक्षण करेल आणि भारताला पाण्याचा प्रवाह रोखू देणार नाही.’ असं पाकिस्तानचे मंत्री मलिक यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा