भलतंच कायपण… लग्नाआधी सेक्स केल्यास… या देशात असं काय केलं जातं? का घाबरतात लोक?
Saudi Arabia Law: अनेक देशांमध्ये लग्नाआधी सेक्स करणे हे पाप मानले जाते, बहुतांशी संस्कृतींमध्ये याला विरोध आहे. अनेक देशांमध्ये लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सौदी अरेबियामध्ये याबाबत सर्वात कडक कायदे आहेत.

अनेक देशांमध्ये लग्नाआधी सेक्स करणे हे पाप मानले जाते, बहुतांशी संस्कृतींमध्ये याला विरोध आहे. अनेक देशांमध्ये लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सौदी अरेबियामध्ये याबाबत सर्वात कडक कायदे आहेत. असा प्रकार समोर आल्यास संबंधित जोडप्याला चाबकाचे 100 फटके मारले जातात किंवा काही प्रकरणांमध्ये मृत्यूदंडही दिला जाऊ शकतो. त्यामुळे या देशात व्हर्जिनिटी दर सर्वात जास्त आहे. या देशात लग्नापूर्वी सेक्स करण्यात का बंदी आहे ते जाणून घेऊयात.
सौदी अरेबिया हा एक इस्लामिक देश आहे. शरिया कायद्यात झिना म्हणजेच अवैध लैंगिक संबंध हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे तरूण या कायद्याचे पालन करतात. कारण अविवाहित जोडप्याने सेक्स केल्यास त्यांना चाबकाचे 100 फटके मारण्याची शिक्षा देण्यात येते. तसेच एखाद्या विवाहित व्यक्तीने अवैध संबंध ठेवले तर त्यांना दगडांनी ठेचून मृत्युदंड दिला जाऊ शकतो. या कायद्यामुळे लैंगिक स्वातंत्र्य दडपले जाते. मात्र यामुळे व्हर्जिनिटी दर वाढतो. एका अहवालानुसार सौदी अरेबियामध्ये अनेक तरूण 25-30 वर्षांच्या वयात व्हर्जिनिटी गमावतात, हा जगातील सर्वात जास्त आकडा आहे.
महिलांसाठी कठोर कायदे
सौदी अरेबियामध्ये महिलांसाठी कठोर कायदे आहेत, कारण या देशात इस्लामचा सर्वात कठोर वहाबी पंथ पाळला जातो. जो महिला आणि पुरूषांना विभक्त करतो. या देशात लिव्ह-इन रिलेशनशिपचा विचार करणे देखील गुन्हा मानला जातो. सेक्सबाबतचा कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासाठी चार साक्षीदार किंवा आरोपीच्या कबुलीजबाब हवा असतो. मात्र काही प्रकरणांमध्ये बळजबरीने कबुलीजबाब घेतला जातो. आजही हा कायदा अस्तित्वात आहे. मात्र क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकाराने पर्यटकांना हॉटेलमध्ये विवाहापूर्वी राहण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
कठोर शिक्षा
अशाप्रकारच्या गु्न्ह्यात दोषी आढळल्यास कठोर शिक्षा दिली जाते. 2007 मध्ये एका गँगरेपच्या प्रकरणात महिलेला दोषी ठरवण्यात आले होते, कारण ती आरोपींसोबत एकटी होती. त्यामुळे तिला चाबकाचे 200 फटके मारण्याची आणि तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली होती. एखादी अविवाहित महिला गर्भवती असल्यास तिला दोषी मानले जाते, त्यामुळे अशा महिला शिक्षेपासून वाचण्यासाठी नवजात बालकांना रस्त्यावर सोडून देतात.
