विमान धावपट्टीवरून घसरलं; 163 जणांचा जीव थोडक्यात वाचला, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
विमान खाली उतरत होते, याचवेळी हवेची जोरदार लाट आली, या लाटीचा फटका या विमानाला बसला. विमान हवेतच डगमगले त्यानंतर ते धावपट्टीवर उतरत असताना घसरले.

इंडोनेशियामधील सर्वात व्यस्त एअरपोर्ट असलेल्या जकार्ताच्या सओनकार्नो -हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा विमान अपघात घडता घडता थोडक्यात वाचला आहे. पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे 163 लोकांचा जीव वाचला आहे. हे विमान सओनकार्नो -हट्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असतानाच धावपट्टीवरून घसरले. मिळत असलेल्या माहितीनुसार या विमानातून 163 जण प्रवास करत होते. याचा एक व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. ही घटना 27 जून रोजी घडली आहे.
व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, हे विमान खाली उतरत होते, याचवेळी हवेची जोरदार लाट आली, या लाटीचा फटका या विमानाला बसला. विमान हवेतच डगमगले त्यानंतर ते धावपट्टीवर उतरत असताना घसरले, ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून काळजा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या विमानामधून 163 जण प्रवास करत होते. पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे या प्रवाशांचा जीव वाचला.
हे विमान जेव्हा धावपट्टीवरून घसरलं तेव्हा या विमानात 157 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स असे एकूण 163 जण प्रवास करत होते. पायलटने शेवच्या क्षणी विमानावर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अपघात टळला आहे, अन्यथा मोठा अपघात या ठिकाणी घडला असता.
Tense Incident at Soekarno-Hatta Airport: Batik Air Plane Nearly Crash Lands Due to Bad Weather A tense incident occurred when a Batik Air plane nearly experienced a crash landing due to bad weather at Soekarno-Hatta Airport (Soetta) in Tangerang, Banten, on Saturday (28/6). The… pic.twitter.com/L7aJDaojGY
— aircraftmaintenancengineer (@airmainengineer) June 29, 2025
दरम्यान काही दिवसांपूर्वीच गुजरातमधील अहमदाबाद येथे देखील मोठा विमान अपघात घडला होता. अहमदाबादवरून लंडनला जाण्यासाठी निघालेलं विमानं अवघ्या काही सेंकदाच एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं या घटनेत शेकडो लोकांनी आपला जीव गमावला आहे.ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मोठा अपघात थोडक्यात वाचला आहे. पायलटनं योग्यवेळी विमानावर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
163 लोकांचा जीव वाचला
या विमानामध्ये 157 प्रवाशांसह 6 क्रु मेंबर्स होते. विमान विमानतळावर उतरत असतानाच जोरदार वादळ आलं. हवेच्या लाटेचा तडाखा विमानाला बसला, त्यानंतर विमान खाली उतरत असतानाच धावपट्टीवरून घसरलं. मात्र चालकानं ऐनवेळी विमानावर नियत्रंण मिळवल्यानं मोठा अपघात टळला आहे.
