VIDEO: कोरोनापासून मुक्ती दे; नरेंद्र मोदींचे बांगलादेशात कालीमातेला साकडे

बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून काल बांगलादेशला आले होते.

VIDEO: कोरोनापासून मुक्ती दे; नरेंद्र मोदींचे बांगलादेशात कालीमातेला साकडे
narendra modi

ढाका: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज त्यांनी प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन पूजा अर्चना केली. यावेळी त्यांनी संपूर्ण जगाला कोरोनापासून मुक्ती दे, असं साकडं कालीमातेला घातलं. (PM Modi offers prayer at centuries-old Jeshoreshwari Kali temple in Bangladesh)

बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य अतिथी म्हणून काल बांगलादेशला आले होते. काल बांगलादेशी नागरिकांशी त्यांनी संवाद साधला होता. आज त्यांनी जोशेश्वरी काली मंदिरात जाऊन पूजा अर्चा केली. देवीची मनोभावे पूजा केल्यानंतर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. आज मला काली मातेची मनोभावे पूजा करण्याचं सौभाग्य मिळालं. कोरोनातून मुक्ती मिळावी म्हणून मी कालीमातेला साकडं घातलं, असं ते म्हणाले.

भारत कम्युनिटी हॉल बांधून देणार

कालीमातेच्या या मंदिरात दोन्ही देशातील भाविक येतात. कालीमातेची येथे यात्रा भरते. दोन्ही देशाचे भाविक या यात्रेत सामिल होतात. मंदिर परिसरात कम्युनिटी हॉलची गरज आहे. हा बहुउद्देशीय हॉल असावा. कालीमातेची पूजा करण्यासाठी आलेल्या भक्तांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. या कम्युनिटी हॉलमधून धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमही राबवले गेले पाहिजे. वादळासारख्या परिस्थितीत या हॉलमध्ये नागरिकांना आश्रय मिळेल, अशा पद्धतीचा हा हॉल तयार केला गेला पाहिजे. हा कम्युनिटी हॉल तयार व्हावा यासाठी भारत मदत करेल, असंही मोदी म्हणाले. हे काम करण्यासाठी बांगलादेश सरकारने संमती दिल्याबद्दल मोदींनी बांगलादेश सरकारचे आभारही मानले.

मतुआ समुदायाच्या मंदिरात जाणार

जेशोरेश्वरी काली मंदिर हे 51 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिरात पूजा केल्यानंतर मोदी आज ओराकांडी येथील मतुआ समुदायाच्या मंदिरातही जाणार आहे. ओराकांडी येथे मतुआ समुदायचे संस्थापक हरिश्चंद्र ठाकूर यांचा जन्म झाला होता. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकांचा बार उडालेला आहे. बंगालमध्ये मतुआ समुदायाची मोठी संख्या आहे. त्यामुळे हा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी मोदींकडून प्रयत्न सुरू आहेत.

पहिले भारतीय नेते

त्यानंतर आज गोपालगंज येथे जाऊन शेख मुजीब उर रहमान यांच्या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. शेख मुजीब उर रहमान यांच्या स्मृती स्थळावर जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय नेते ठरणार आहेत. नंतर बंगबंधू बापू म्युझियमचं ते उद्घाटन करणार आहेत. तसेच भारत-बांगलादेशादरम्यान चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचंही ते उद्घाटन करणार आहेत. (PM Modi offers prayer at centuries-old Jeshoreshwari Kali temple in Bangladesh)

 

संबंधित बातम्या:

बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्यासाठी मीही तुरुंगात गेलो होतो: PM मोदी

बांग्लादेशच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

दोन दिवसापूर्वी चीनची लस टोचून घेतली, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोना

(PM Modi offers prayer at centuries-old Jeshoreshwari Kali temple in Bangladesh)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI