
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 50% कर लावण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र याउलट आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. गुंतवणूकदार आनंदी होते आणि त्यांनी बाजारात मोठी गुंतवणूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जीएसटीमध्ये बदल करण्याची घोषणा केली होती, त्यामुळे ही तेजी पहायला मिळाली. आता याचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लावल्याने बाजार घसरत होता, मात्र पंतप्रधान मोदींनी जीएसटीमध्ये सुधारणा करण्याची घोषणा करताच सेन्सेक्स 1100 अंकांनी वाढला. आज सकाळी अवघ्या 35 मिनिटांत गुंतवणूकदारांनी सुमारे 9 लाख कोटी रुपये कमावले. यावरून मोदी सरकारने जीएसटीच्या माध्यमातून अमेरिकेच्या कर लादण्याच्या निर्णयाला चोख प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे. भारताचे हे पाऊल खूप मजबूत आणि प्रभावी असल्याचे अमेरिकन एजन्सींनीही मान्य केले आहे.
मोदी सरकारने जीएसटी दर कमी केल्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. यामुळे खरेदी वाढेल आणि देशातील उत्पादन आणि आर्थिक घडामोडींनाही गती मिळेल. अमेरिकन कंपनी मॉर्गन स्टॅनलीने म्हणले की, भारताच्या या निर्णयामुळे भारताचा आर्थिक विकास दर 0.5% ते 0.7% वाढू शकतो. कारण आता सुमारे 99 % वस्तू, ज्यावर पूर्वी 12% जीएसटी होता, त्यावर आता फक्त 5% कर आकारला जाणार आहे. तसेच ज्या वस्तूंवर पूर्वी 28% कर होत. त्यापैकी सुमारे 90 % वस्तूंवर आता 18% कर आकारला जाणार आहे. काही लक्झरी वस्तू आणि सिगारेट, दारू यावर मात्र जास्त कर आकारला जाणार आहे.
सरकारने केलेल्या या बदलांमुळे गरजेच्या बहुतेक वस्तू स्वस्त होणार आहेत, याचा थेट फायदा सामान्य लोकांना होणार आहे. यामुळे बाजारात वापर वाढेल आणि देशांतर्गत कंपन्यांना त्याचा फायदा होईल. मॉर्गन स्टॅनली आणि एमके ग्लोबल सारख्या ब्रोकरेज कंपन्यांनी असा अंदाज वर्तवला की, ‘जीएसटीमधील या बदलांमुळे बाजारात सुमारे 2.4 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी येईल. यामुळे भारताचा जीडीपी विकास 50 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढू शकतो.
भारतावर कर लादून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव होता. मात्र पंतप्रधान मोदींनी जीएसटी दरांमध्ये बदल करून अमेरिकाचा कर लादण्याचा निर्णय हाणून पाडला आहे. आता भारतीय वस्तूंची विक्री भारतातच वाढणार आहे, त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॅरिफच्या निर्णयाचा फटका आता अमेरिकेलाच बसणार आहे. भारताच्या या निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.