पाकिस्तानचा पराभव केवळ पाक सैन्याचा पराभव नाही… प्रसिद्ध अमेरिकन तज्ज्ञाने सांगितली विजयाची इन्साईड स्टोरी
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या स्वदेशी शस्त्रांची प्रभावी कामगिरी जगासमोर आली आहे. जॉन स्पेन्सर यांच्या अहवालानुसार, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे भारताने पाकिस्तानला पराभूत केले. ब्रह्मोस, K9 वज्र यांसारख्या स्वदेशी शस्त्रांनी अचूक हल्ले केले. चिनी शस्त्रांच्या अपयशाचा उलगडाही यात झाला आहे. भारताची वाढती आत्मनिर्भरता आणि स्वदेशी शस्त्रनिर्मितीची क्षमता हे या लेखात अधोरेखित केले आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर सामान्य लोकांमध्ये भारतीय शस्त्रांची जोरदार चर्चा सुरू आहे. भारताने आतापर्यंत लढाऊ विमानांचे इंजिन का तयार केले नाही? असं अनेक लोक विचारत आहेत. या प्रश्नाच्या मागे अनेक फॅक्टर्स आहेत. पण यामागचा सर्वात मोठा फॅक्टर राजकीय इच्छाशक्तीचा आहे. 2014नंतर भारतीय डिफेन्स इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनाचं काम सुरू झालं. मोदी सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला आणि स्वदेशी शस्त्रे तयार करण्याचं टार्गेट ठेवलं. परदेशातील शस्त्रांवरील अवलंबित्व कमी करणं हा त्यामागचा उद्देश होताच. शिवाय भारतीय डिफेन्स इंडस्ट्रीलाही ग्लोबल करायचं होतं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. पण जेव्हा पाकिस्तानने दहशतवाद्यांची साथ देऊन भारतावर हल्ला केला तेव्हा मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताची खरी परीक्षा सुरू झाली. प्रसिद्ध अमेरिकन संरक्षण तज्ज्ञ जॉन स्पेन्सर यांनी भारत-पाकिस्तान तणाव आणि भारताचा झालेला विजय यावर अचूक विश्लेषण केलं आहे.
अमेरिकन डिफेन्स एक्सपर्ट जॉन स्पेन्सर यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावर एक समीक्षात्मक अहवाल तयार केला आहे. त्यात त्यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेचं कौतुक केलं आहे. स्पेन्सर हे अमेरिकेतील वॉर इन्स्टिट्यूटमध्ये शहरी युद्धावर लेक्चर घेत असतात. जॉन स्पेन्सर यांनी या रिपोर्टमध्ये महत्त्वाचे उल्लेख केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहीम पाकिस्तानच्या विरोधातील खरी विजेती ठरली आहे. भारताने केवळ परीक्षाच पास केली नाही तर, भारत स्वत:च्या शस्त्राने, स्वत:च्या आकाशात आणि स्वत:च्या अटीवर लढाई लढू शकतो हे भारताने जगाला दाखवून दिलं आहे. मोदी सरकारने 2014मध्ये एफडीआयचे दरवाजे 74 टक्के उघडण्यात आले. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपला प्रोत्साहन दिलं आणि अनेक अॅडव्हान्स सिस्टिम, जसं की ब्रह्मोस, K9 वज्र आणि AK-203 सारख्या वेगाने चालणारे शस्त्र स्वदेशी उत्पादनात बनवण्यास सुरुवात झाली.
युद्धाच्या मैदानात भारतीय शस्त्र पास
कोव्हिडच्या संकटात चीनसोबत गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताच्या आत्मनिर्भर शस्त्र निर्मितीच्या दिशेने दुसरी लाट आली. मोदींनी आत्मनिर्भर भारत हा एका सिद्धांतासारखा मांडला. तथापि त्यांनी आपत्कालिन शस्त्र खरेदी करण्याची सैन्याला मुभा दिली. पण स्वदेशी रिसर्च अँड डेव्हल्पमेंट, डिझाईन आणि प्रोडक्शनमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिलं. 2025पर्यंत भारताने संरक्षण खरेदीत देशांतर्गत सामग्रीला 30 टक्क्याहून 65 टक्क्यावर नेलं. त्याचं लक्ष दशकाच्या अखेरपर्यंत 90 टक्के करणं होतं. आत्मनिर्भर भारताच्या क्षमतेची परीक्षा 22 एप्रिल रोजी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झाली. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. भारताने दहशतवाद्यांच्या विरोधातील लढाईत ज्या पद्धतीने शस्त्रांचा वापर केला आणि भारतीय शस्त्रांनी जेवढ्या अचूकतेने हल्ला केला, त्याने अख्ख्या जगाला थक्क केलं. भारताच्या स्वदेशी शस्त्रांनी जगाच्या मंचावर स्वत:ला सिद्ध केलं. म्हणजे विचार करा, भारताने ड्रोनने पाकिस्तानच्या चिनी एअर डिफेन्स सिस्टिम पाडली. हे चमत्कारापेक्षा कमी नाही, असं स्पेन्सर यांनी म्हटलंय.
ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारताने आपल्या स्वदेशी हत्यारांचा अभूतपूर्व पद्धतीने वापर केला आहे. भारताच्या ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईलने शत्रूंचे बंकर, रडार स्टेशन आणि सुमारे डझनभर एअरबेस उद्ध्वस्त केले. तर आकाश-आकाशतीर सिस्टिमने पाकिस्तानच्या चिनी निर्मित मिसाईल आणि ड्रोनला हवेतच संपुष्टात आणलं. इस्त्रोच्या सॅटेलाईटने भारतीय हवाई दलाला पाकिस्तानी टार्गेट्सवर अचूक हमले करण्याची क्षमता दिली. त्यानंतर भारताने रशियन एअर डिफेन्स सिस्टिम एस-400 ने पाकिस्तानच्या AWACS एअर क्राफ्टला हवेतच पाडून त्याच्या सर्व्हिलान्सच्या क्षमतेवर खोल परिणाम केला. त्यानंतर भारताने भोलारी एअरबेसवरील दुसऱ्या AWACS एअरक्राफ्टलाही पाडून पाकिस्तान हवाईदलाची 70 टक्के सर्व्हिलान्स क्षमतेला संपुष्टात आणलं, असंही स्पेन्सर यांनी स्पष्ट केलंय.
— John Spencer (@SpencerGuard) May 29, 2025
पाकिस्तानचे कोणते चिनी शस्त्रे फेल
JF-17 Thunder (Block II/III) :
JF-17 लढाऊ विमान भलेही पाकिस्तानात बनलं असेल पण चीननेच ते पूर्णपणे बनवलं आहे. जेएफ-17मध्ये चिनी एव्हिओनिक्स, रडार, इंजिन (आरडी-93) आणि फायर करणाऱ्या शस्त्रांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय हवाईदलाचे मिसाईल आणि एअर डिफेन्सचा सामना करण्यात अपयशी ठरले. या विमानांची सीमित पेलोड, जुनी रडार आणि आणि खराब उत्तरजिवीता भारतीय हवाई दलाच्या समोर अत्यंत कमकुवत निघाले. त्याचा परिणाम असा झाला की 7 मे रोजीच्या रात्रीनंतर पाकिस्तान हवाई दलाने आपल्याच लढाऊ विमानांना लढण्यासाठी पाठवलं नाही. भारताने जेव्हा भोलारी बेसवर मिसाईलचा हल्ला केला तेव्हा त्यात दोन जेएफ-17 फायटर जेट बरबाद झाले. अमेरिकेत दोन एफ -16 फायटर जेटही नष्ट झाल्याची रिपोर्ट आली आहे.
HQ-9 / HQ-16 SAM सिस्टम :
रशियाच्या S-300 आणि Buk सिस्टिमला कॉपी करून चीनने HQ-9 आणि HQ-16 एअर डिफेन्स सिस्टिम बनवली आहे. या सिस्टिमला भारतीय हवाई दल आणि मिसाइल हल्ले रोखण्यासाठी तैनात करण्यात आलं होतं. पण ते भारताच्या जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या समोर पूर्णपणे अपयशी ठरले. भारताने लाहोर रडार सिस्टिमला आपल्या ड्रोनने उडवलं. भारताच्या मिसाइल रोखण्यात चिनी एअर डिफेन्स पूर्णपणे अपयशी ठरल्या.
LY-80 आणि FM-90 एअर डिफेन्स :
जुन्या शॉर्ट आणि मीडियम रेंज असणाऱ्या सरफेस टू एअर मिसाइल सिस्टिम सुद्धा चीनमध्येच बनल्या आहेत. दोन्हीही भारताच्या कमी उड्डाण भरणारे ड्रोन आणि अचूक शस्त्रांचा ठाव घेण्यास किंवा रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडे भारतीय मिसाइलच्या विरोधात प्रतिक्रिया देण्याची क्षमताच संपली आहे.
CH-4 ड्रोन :
पाकिस्तानने मोठ्या संख्येने चीनकडून CH-4 खरेदी केले आहेत. तुर्कीच्या ड्रोनसोबत मिक्स करून या ड्रोनचा भारताच्या विरोधात वापर केला गेला. पण यातील एकही ड्रोन भारताच्या विरोधात यशस्वी होऊ शकला नाही. बहुतेक ड्रोन जाम करण्यात आले किंवा एकतर पाडण्यात आले. चीनचे ड्रोन भारताच्या D4S सिस्टमच्या वर्चस्व असलेल्या परिसरात आणि इलेक्ट्रॉनिक वातावरणात कीड पतंगासारखे कोसळून भस्म झाले.
आत्मनिर्भर शस्त्रांच्याबाबत भारत आता संप्रभु राष्ट्र बनलं आहे. भारत स्वत:च्या हत्याराने लढतो आणि जिंकतोही हा स्पष्ट संदेश ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण जगात गेला आहे. पाकिस्तानचा पराभव हा केवळ सैन्याचा पराभव नाही, तर, चिनी हार्डवेअरच्या बळावर शक्तीशाली असल्याचा पाकिस्तानने जो भ्रम करून घेतला होता, त्या धोरणाच्या खोटेपणाचाही हा पराभव आहे. दरम्यान, भारताला अजूनही लढाऊ विमानांच्या निर्माणाचं काम करावं लागणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय डिफेन्स सेक्टरच्या आत्मनिर्भरतेची तिसरी लाट सुरू झाली आहे. येत्या 10 वर्षात भारताच्या स्वदेशी शस्त्रांच्यासमोर मोठमोठ्या शक्तींनाही उभं राहणं मुश्किल होईल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे.
