AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात सत्तापालट होणार ? मुनीर आणि नकवी यांच्या पॉवर प्लेने शहबाज- झरदारी हतबल…

विश्लेषकांच्या मते, मोहसिन नकवी आणि आसिम मुनीर यांच्या घनिष्ठ संबंधांमुळे मुनीर यांनी शहबाज सरकारला डावलून अमेरिका आणि इराण यांच्या युद्धादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी नकवी यांची आपले विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती.

पाकिस्तानात सत्तापालट होणार ? मुनीर आणि नकवी यांच्या पॉवर प्लेने शहबाज- झरदारी हतबल...
Asim Munir and Mohsin Naqvi
| Updated on: Aug 04, 2026 | 9:35 PM
Share

पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या राजकीय सत्तापालट होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. गृहमंत्री आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसिन नकवी यांनी देशाच्या प्रशासन संपूर्णपणे अपयशी आणि इतिहासातील सर्वात मोठा घोटाळेबाज प्रशासन असल्याची जहरी टीका केल्यानंतर इस्लामाबाद येथे हडकंप माजला आहे.

गृहमंत्री आणि पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसिन नकवी यांनी जजेस, राजकारणी आणि नोकशाहीवर २१ वर्षांपासून लाचखोरी करीत असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सैन्य दल प्रमुख आसिम मुनीर यांच्या वरदहस्ताने नकवी यांनी शहबाज शरीफ यांच्या सरकारला थेट आव्हान दिले जात आहे.

पाकिस्तान इकॉनॉमिक समीटमध्ये गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी उघडपणे देशाचा दशकाहून जुना प्रशासकीय ढाचा संपूर्णपणे उद्धवस्त झाल्याचा आरोप केला आहे.त्यानंतर नकवी यांनी मिडियाशी बोलताना दावा केला की पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. ते म्हणाले की गेल्या २१ वर्षांपासून जजेस, नोकरशाह, राजकारणी आणि बँकर्सना लाच दिली जात होती. नकवी यांनी या भष्ट्राचारात अडकलेल्या प्रत्येकाविरोधात कठोर कारवाई करण्याची शपथ घेतली आहे.

नकवी यांचा पावर प्ले

मोहसिन नकवी यांचा प्रवास एका माध्यमप्रमुखापासून एका शक्तिशाली राजकारणी असा झपाट्याने झाला आहे. पंतप्रधान होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा फार पूर्वीपासून आहे. मोहसिन नकवी यांच्या या वक्तव्यांमागे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांचा थेट हात असल्याचे म्हटले जात आहे. नकवी हे जनरल मुनीर यांचे जवळचे नातलग मानले जातात असे पाकिस्तानच्या सध्याच्या स्थितीवर जिओ पॉलिटिकल आणि संरक्षण तज्ज्ञ संदीप उन्नीथन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

शहबाज यांना साईड लाईन करण्याची तयारी

बलूचिस्तान आणि पीओके (PoK) वाढता असंतोष दरम्यान जनरल आसिम मुनीर त्यांची पकड आणखी मजबूत करु इच्छीत आहेत. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की मुनीर त्यांचा मोहरा मोहसिन नकवी यांच्याद्वारे देशातील नवीन प्रांत वा प्रशासकीय विभाग तयार करण्याचा माहोल तयार करत आहेत. याचा अंतिम हेतू मुनीर यांच्यासाठी परवेश मुशर्रफ यांच्या धर्तीवर राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षक दलाचे प्रमुख म्हणून संपूर्ण सत्ता प्राप्त करण्याचा आहे.

PML-N आणि PPP यांची गुपचिळी

देशातील उत्तरदायित्व आणि न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी नकवी यांनी नवीन प्रशासकीय प्रांतांच्या निर्मितीचे समर्थन केले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या एका प्रवक्त्यानेही सुरक्षा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून या प्रशासकीय पुनर्रचनेला पाठिंबा दिला आहे. मात्र, सत्ताधारी पीएमएल-एन आणि पीपीपी या मुद्द्यावर गप्प राहिले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही पक्षांची राजकीय ताकद पंजाब आणि सिंध प्रांतांमधून येते. प्रांतीय सीमा बदलल्यास त्यांचा राजकीय प्रभाव कमी होऊ शकतो.

संरक्षण मंत्र्याचा पलटवार

मोहसिन नकवी यांच्या सातत्याच्या वक्तव्याने चिडलेले पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आसिफ म्हणाले की नकवी गेल्या तीन वर्षांपासून खूपच शक्तीशाली पदावर आहेत आणि ते पंतप्रधानादेखील उत्तरदायी नाहीत. त्यांच्यावर टीका करताना ते पुढे म्हणाले की इतका ताकदवान व्यक्ती देखील तक्रार करत असेल तर बाकी मंत्र्यांना तर घरी जायला हवे. आसिफ यांनी कॅबिनेट आणि संसदीय सत्रात नकवी यांच्या मर्यादित भागीदारीवर देखील टीका केली. त्यांनी दावा केला की नकवी कॅबिनेटच्या दोन वा तीन बैठकात सामील झाले आहेत. संसदेत देखील नकवी यांची उपस्थिती खूप कमी राहिली आहे. आसिफ यांनी नकवी यांना सल्ला दिला आहे की त्यांना सिस्टीम बदलायची असे तर त्यांनी सुरुवात त्यांच्या मंत्रालय आणि पीसीबीपासून करावी. कारण क्रिकेट चाहते त्यांच्या कामापासून खूष नाहीत.

रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय बैठकांचा दौर सुरू आहे. नागरी यंत्रणा आणि न्यायपालिकेला कोंडीत पकडले जात असून, त्यामुळे शहबाज शरीफ आणि राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पदांना धोका निर्माण झाला आहे. लष्कराचा नेहमीच पाकिस्तानच्या सरकारमध्ये हात राहिला आहे आणि आता ते पुन्हा एकदा थेटपणे किंवा आपल्या मित्रपक्षांमार्फत लष्कर संपूर्ण सत्ता काबीज करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार