AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा पहिला झटका, भारतातील अमेरिकन कंपन्यांचे दिवाळे निघणार?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…

भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून संबंध ताणले गेले असतानाच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफ वादावर मोठा संदेश दिला आहे. हा अमेरिकेला मोठा धक्का म्हणावा लागेल. नरेंद्र मोदी हे टॅरिफबद्दल काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा असतानाच त्यांनी भाष्य केले.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा पहिला झटका, भारतातील अमेरिकन कंपन्यांचे दिवाळे निघणार?, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
Narendra Modi and Donald Trump
| Updated on: Aug 17, 2025 | 3:21 PM
Share

भारत आणि अमेरिकेत टॅरिफवरून तणाव आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर टीका करताना दिसत आहे. त्यांनी भारताची सुटका टॅरिफमधून होणार नसल्याचे स्पष्ट केले. यासोबतच दिल्ली येथे होणाऱ्या व्यापार करारची बैठक अमेरिकेकडून रद्द करण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताच्या विरोधात आग ओकत आहेत. या टॅरिफ वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शेवटी आता नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत मोठा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांना दिलाय. पंतप्रधानांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट झाले की, अमेरिकेने कितीही दबाव टाकला तरीही भारत झुकणार नाहीये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॅरिफच्या मुद्दावरून अमेरिकेची मोठी कोंडी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होताना दिसतंय. नरेंद्र मोदी हे आज दिल्ली एनसीआर येथील राजमार्गाचे उद्धाटन करण्यासाठी पोहोचले होते. यावेळीच्या भाषणात त्यांनी म्हटले की, तुम्ही भारताचेच प्रोडक्ट खरेदी करा. आपल्या देशात बनलेल्या स्वदेशी वस्तूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. वोकल फॉर लोकल मंत्रासाठी माझी साथ द्या आणि याच्यासोबत उभे राहा.

11 वर्षापूर्वी आपण जास्त करून फोन इंपोर्ट करत होतो. आज जास्त करून भारतीय मेड इन इंडिया फोन वापरतात. आपण लोक 35 करोड मोबाईल बनवत आहोत. विशेष म्हणजे याला एक्सपोर्ट देखील केले जाणार आहे. आता भारताने अमेरिकेच्या टॅरिफ विरोधात मोठा डाव टाकल्याचे बघायला मिळतंय. भारतीय बाजारपेठेत अमेरिकन कंपन्या मोठ्या प्रमाणात अजून मोठी उलाढाल करतात. आता त्याच कंपन्यांचे कंबरडे मोडण्यासाठी हा निर्णय सरकारकडून घेण्यात आलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नव्या नाऱ्यानंतर भारतात असलेल्या अमेरिकन कंपन्यांवर थेट परिणाम होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी थेट लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्यास सांगितले आहे. हा एकप्रकारे अमेरिकाला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या कोणत्याही अटी अजून मान्य केल्या नाहीत. तो अमेरिका मोठा धक्का असतानाच आता भारताने अमेरिकेच्या टॅरिफच्या विरोधात मोठा नारा दिला आहे. अमेरिकेचा गेम त्यांच्यावरच उलटा पडल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. आता यावर डोनाल्ड ट्रम्प हे काय बोलतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.