AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putin Health Status: रशियाचे अध्यक्ष पुतिन हे गंभीर आजारी; पुतिन यांचा थरथर कापनारा व्हिडिओ व्हायरल

विशेष म्हणजे, रशियन राष्ट्राध्यक्षांची प्रकृती जगासाठी नेहमीच चर्चेचा विषय असते आणि जेव्हापासून युक्रेनवर आक्रमण सुरू झाले तेव्हापासून ते गंभीर आजारी असल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत.

Putin Health Status: रशियाचे अध्यक्ष पुतिन हे गंभीर आजारी; पुतिन यांचा थरथर कापनारा व्हिडिओ व्हायरल
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिनImage Credit source: tv9
| Updated on: Jun 15, 2022 | 8:54 PM
Share

Putin Health Status: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभर टीकेचे धनी झाले आहेत. जेव्हा पुतिन हे नाव येत तेव्हा रशिया-युक्रेन युद्ध समोर येतं. पण आता अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आले आहेत. पुतिन यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (video viral) होत असून त्यामुळे अफवाना उधान आले आहे. तर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे पुतिन यांच्या आरोग्याबद्दल नवीन चिंता वाढवली आहे. तर पुतिन यांना ब्लड कॅन्सरने (Blood Cancer) ग्रासल्याचे वृत्त वाचण्यात येत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, अध्यक्ष क्रेमलिनमध्ये एका पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते, जेथे ते थरथर कापत होते आणि उभे राहण्यासाठी धडपडत होते. व्हिडिओमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन व्यासपीठाजवळ उभे राहून भाषण करताना दिसत आहेत आणि त्यांचे पाय ही थरथरताना दिसत आहेत.

सोशल मीडिया पोस्टनुसार, हे एक धोक्कादायक दृश्य आहे. पुतिन यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना जास्त काळ सार्वजनिक ठिकाणी उपस्थित न राहण्याचा सल्ला दिला आहे. पण तरीही पुतिन एका सार्वजनिक कार्यक्रमात आपली उपस्थिती लावली.

पुतीन आजारी ?

विशेष म्हणजे, रशियन राष्ट्राध्यक्षांची प्रकृती जगासाठी नेहमीच चर्चेचा विषय असते आणि जेव्हापासून युक्रेनवर आक्रमण सुरू झाले तेव्हापासून ते गंभीर आजारी असल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत.

असा दावा पुतिन यांच्याबाबत

फॉक्स न्यूजने मंगळवारी एका अहवालात म्हटले आहे की, रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा एक विशेष सहाय्यक आहे. जो पुतिन परदेशात असताना त्यांची विष्ठा आणि मूत्र गोळा करतो आणि मॉस्कोमध्ये विल्हेवाट लावण्यासाठी परत आणतो. मलमूत्र मागे सोडल्यास पुतिन यांच्या आरोग्याविषयी खूप माहिती उघड होऊ शकते या भीतीने हे केले जात असल्याचेही म्हटलं आहे. गेल्या महिन्यात एका रशियन नेत्याने पुतीन यांना ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे सांगितले होते.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.