“भारताचे पंतप्रधान ‘जबाबदार’, चीनसोबतचे प्रश्न सोडवायला सक्षम”, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) जबाबदार नेते असल्याचं मत व्यक्त केलंय.

भारताचे पंतप्रधान 'जबाबदार', चीनसोबतचे प्रश्न सोडवायला सक्षम, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
रशियाचे अध्यक्ष पुतीन हे आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 7:02 PM

मॉस्को : रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) जबाबदार नेते असल्याचं मत व्यक्त केलंय. तसेच दोन्ही नेते भारत-चीन प्रश्न (India-China Issue) सोडवण्यासाठी सक्षम असल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे पुतिन यांनी भारत-चीन प्रश्नात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करायला नको असंही स्पष्ट केलंय. ते मागील अनेक दिवसांपासून भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते (Russia President Vladimir Putin praise Indian PM Narendra Modi India-China Issue).

रशियाने भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सहभागातून तयार झालेल्या क्वाड (Quad) मंचावर टीका केलीय. व्लादिमीर पुतिन म्हणाले, “कोणता देश कुणासोबत आघाडी करतो आहे किंवा कोणत्या देशाने कुणासोबत मैत्री करावी यावर बोलण्याची जबाबदारी रशियाची नाही. मात्र, एखाद्या देशाविरुद्ध कोणतीही आघाडी तयार करायला नको.” पुतिन यांना चीनविरुद्धच्या क्वाड मंचात भारताच्या सहभागावर विचारले असता त्यांनी हे उत्तर दिलं.

“शेजारी देशांमध्ये वादग्रस्त मुद्दे असतात, भारत-चीनचे मुद्दे ते स्वतः सोडवतील”

“भारतासोबत रशियाची भागेदारी असल्यानं रशिया आणि चीनच्या संबंधांमध्ये कोणताही विरोधाभास नाही. भारत आणि चीनमध्ये काही वादाचे मुद्दे आहेत हे मला माहिती आहे. मात्र, शेजारी देशांमध्ये नेहमीच असे वादग्रस्त मुद्दे असतात. मी भारताचे पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष दोघांनाही चांगल्या प्रकारे ओळखतो. ते जबाबदार लोक आहेत आणि प्रामाणिकपणे एकमेकांचा सन्मान करतात. त्यांना आत्ता सामना करावा लागत असलेल्या प्रश्नांवर ते उत्तर शोधतील असा मला विश्वास आहे. मात्र, इतर कोणत्याही तिसऱ्या देशाने यात हस्तक्षेप करु नये हे आवश्यक आहे.”

सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव

भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाख सीमेवर एक वर्षापासून अधिक काळा झाला तसा तणाव आहे. या तणावातूनच 45 वर्षांमध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झडप झाली. यात दोन्हीकडील सैनिकांचा मृत्यू झाला. पँगोंग तलाव परिसातील तणाव कमी करण्याबाबत काही प्रगती नक्कीच झालीय. मात्र, अद्यापही तणाव आहे. याशिवाय प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही (LAC) तणाव आहे. हा तणाव कमी करण्यासाठी बैठकही आयोजित करण्यात आली. मात्र, अद्याप यावर तोडगा निघालेला नाही.

हेही वाचा :

मृत्यू अन् विनाशासाठी चीननं 10 ट्रिलियन डॉलर द्यावेत, डोनाल्ड ट्रम्प कडाडले

अमेरिकेच्या डॉ फॉसींनी वुहान लॅबला पैसे दिले होत? चिनी संशोधकासोबचे ईमेलमुळे संशय वाढला

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीनकडून ‘स्टील्थ बॉम्बर’च्या चाचण्या, अणु बॉम्ब टाकण्यासह काय क्षमता?

व्हिडीओ पाहा :

Russia President Vladimir Putin praise Indian PM Narendra Modi India-China Issue

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....