अमेरिकेच्या डॉ फॉसींनी वुहान लॅबला पैसे दिले होत? चिनी संशोधकासोबचे ईमेलमुळे संशय वाढला

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ एंथनी फॉसी (Dr. Anthony Fauci) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्यावर गंभीर आरोप झालेत.

अमेरिकेच्या डॉ फॉसींनी वुहान लॅबला पैसे दिले होत? चिनी संशोधकासोबचे ईमेलमुळे संशय वाढला


वॉशिंग्टन : जगभरात मृत्यूचं तांडव करणाऱ्या कोरोना विषाणूची (Coronavirus) निर्मिती चीनमधील (China) वुहानच्या प्रयोगशाळेत (Wuhan Lab) झाल्याचा आधीपासूनच आरोप होत आलाय. त्यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ एंथनी फॉसी (Dr. Anthony Fauci) आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्यावर गंभीर आरोप झालेत. वॉशिंग्टन पोस्ट या प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या (The Washington Post) हाती डॉ. फॉसी यांचे जुने ईमेल लागले आहेत. त्यावरुन या दोघांवर वुहान प्रयोगशाळेला पैसे दिल्याचा आरोप होत आहे. तसेच कोरोना काळात फॉसी चीनच्या वरिष्ठ संशोधकाशी मेलवर बोलत होते, असंही यातून समोर आलंय (Leak Emails of Dr Anthony Fauci shows discussion of him with Wuhan lab scientist)
.

वॉशिंग्टन पोस्टने डॉ फॉसी यांची 866 पानांची मेल चॅट सार्वजनिक केलीय. या मेलमधील माहितीनुसार, फॉसी आणि चीनचे संशोधक यांच्यात चर्चा होत होती. डॉ फॉसी यांनी कोरोना लसीबाबत बिल गेट्स यांनाही ईमेल केला होता. विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून डॉ. फॉसी यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. त्यात वुहानमधील प्रयोगशाळेला पैसे देण्याचाही आरोप आहे. त्यातच हे ईमेल लिक झाल्यानं फॉसी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता फॉसी यांना आधीपासून कोरोना विषाणूची माहिती असल्याचा आरोप केला जात आहे.

फॉसी यांच्याकडून चीनच्या वरिष्ठ संशोधकांशी मेलवर चर्चा

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, चीनच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे संचालक डॉ. जार्ज गाउ आणि डॉ एंथनी फॉसी हे सातत्याने मेलवर एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांमध्ये अनेकदा कोरोना विषाणूवर चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत मैत्रीपूर्ण पद्धतीने होत असल्याचं या मेलमध्ये दिसतं आहे. याशिवाय जगभरात चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू पसरल्याचा आरोप होत असतानाही फॉसी यांनी एकदाही चीनच्या संशोधकाला त्याबाबत विचारणा केली नाही.

सोबत मिळून काम करण्यावर चर्चा

या मेलमध्ये चीनच्या शास्त्रज्ञाने फॉसी यांना मास्कच्या वापराबाबत सावध केलंय. जर अमेरिकेने मास्कबाबत कठोर भूमिका घेतली नाही तर ते अमेरिकेसाठी धोकादायक ठरेल असं मत चीनच्या शास्त्रज्ञाने म्हटलं होतं. याशिवाय डॉ. फॉसी यांच्या एका मुलाखतीवरुन चीनच्या संशोधकाने फॉसी पत्रकारांसारखे बोलत असल्याचं म्हटलं. तसेच हा विषाणू संपवण्यासाठी आपल्याला एकत्रित काम करावं लागेल असंही म्हटलं.

बिल गेट आणि फॉसी यांच्यात काय चर्चा?

या ईमेलमधील चॅटवरुन हे लक्षात येतं की बिल गेट आणि फॉसी आधीपासून एकमेकांच्या संपर्कात होते. फॉसी यांनी मागील वर्षीच 1 एप्रिलला बिल गेट्स यांना फोन करत बिल गेट्स-मेलेनिया फाऊंडेशनच्या माध्यमातून लसी निर्मितीवर सहकार्य करण्यास सांगितलं होतं. एका मेलमध्ये फॉसी यांनी बिल गेट्स यांना अमेरिकेच्या सरकारसोबत मिळून काम करायला हवं असंही सुचवण्यात आलं होतं. फॉसी यांना कौतुकाचे आणि धमकीचे मेल येत असल्याचंही या मेलमधून समोर आलंय.

हेही वाचा :

भारतात कोरोना संपण्यासाठी ‘हा’ एकमेव उपाय, अमेरिकेच्या मुख्य आरोग्य सल्लागारांकडून सुतोवाच

Covaxin: भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोनाच्या बी.1.617 वेरियंटवर प्रभावी, अमेरिकेचे CMO डॉ.अँथनी फौसींचं वक्तव्य

अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….

व्हिडीओ पाहा :

Leak Emails of Dr Anthony Fauci shows discussion of him with Wuhan lab scientist

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI