तब्बल 41 वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे बलात्काराचा खटला; केस बंद करण्याची पीडितेची मागणी

बलात्काराच्या अनेक खटल्यांमध्ये  जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन, आरोपीला तातडीने शिक्षा झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र बलात्काराचा असाही एक खटला आहे. जो अहमदाबाद सेशन कोर्टामध्ये गेल्या 41 वर्षांपासून सुरू आहे.

तब्बल 41 वर्षांपासून न्यायालयात सुरू आहे बलात्काराचा खटला; केस बंद करण्याची पीडितेची मागणी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 17, 2021 | 10:19 AM

अहमदाबाद: बलात्काराच्या अनेक खटल्यांमध्ये  जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन, आरोपीला तातडीने शिक्षा झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र बलात्काराचा असाही एक खटला आहे. जो अहमदाबाद सेशन कोर्टामध्ये गेल्या 41 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अद्यापही या प्रकरणाचा निकला लागलेला नाही. शेवटी कंटाळून या प्रकरणातील पीडितेनेच ही केस आता बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे. आता या पीडितेचे वय 55 वर्ष आहे.

काय म्हटले पीडितेने?

न्यायाधीश डी.एम. व्यास यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू असताना या महिलेने आता ही केस बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे. महिलेने न्यायालयात सांगितले की, आता माझे वय 55 वर्ष आहे. बालात्काराच्या घटनेला आता 41 वर्ष उलटून गेले आहेत. आणखी काही काळ या सर्व कादेशीर प्रक्रियेचा भाग बणण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे हा खटला बंद करण्यात यावा.

काय आहे घटना? 

संबंधित पीडितेने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. मुंबईतील एका टॅक्सीचालकावर हे आरोप करण्यात आले होते. ही घटना 30 जुन 1980 रोजीची आहे. जेव्हा बलात्कार झाला तेव्हा संबंधित पीडितेचे वय 16 वर्ष होते. या घटनेला आता तब्बल 41 वर्ष उलटून गेले आहेत. मात्र तरी देखील अद्यापही या महिलेला न्याय मिळू शकलेला नाही. शेवटी या 55 वर्षीय महिलेनेच आता ही केस बंद करण्यात यावी अशी मागणी न्यायालयात केली आहे.

 

संबंधित बातम्या

Nagpur Crime | 1 कोटी रुपयांची प्रतिबंधित सुपारी जप्त, ट्रान्सपोर्ट प्लाझा येथे गुन्हे शाखेनं टाकला छापा

अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार

Aurangabad Murder | मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या 22 वर्षीय तरुणाचा गळा चिरुन खून, औरंगाबादेत खळबळ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें