AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Oil Import : पेमेंटच्या प्रॉब्लेममुळे भारताच्या दिशेने येणारं इराणी जहाज अचानक चीनकडे वळलं का? अखेर केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण

India Oil Import : मीडियामध्ये एक बातमी आली. एक इराणी तेल जहाज भारताच्या दिशेने येत होतं. पण पेमेंटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे अचानक ते जहाज चीनच्या दिशेने वळलं. आता यावर सरकारकडून उत्तर आलं आहे.

India Oil Import : पेमेंटच्या प्रॉब्लेममुळे भारताच्या दिशेने येणारं इराणी जहाज अचानक चीनकडे वळलं का? अखेर केंद्र सरकारने दिलं स्पष्टीकरण
Oil Tanker Image Credit source: Representative Image
| Updated on: Apr 04, 2026 | 4:38 PM
Share

इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक जवळपास ठप्प करुन ठेवलेली आहे. तिथून एखाद्या जहाजाला जायचं असेल तर इराणची मंजुरी आवश्यक आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल टंचाई निर्माण होत आहे. प्रति बॅरल कच्चा तेलाच्या किंमती वाढत चालल्या आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणी तेलावरील प्रतिबंध काही काळासाठी मागे घेतले. समुद्रात तेल टँकरवर लोड झालेलं इराणी तेल विकत घेण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर लगेच भारतासह अनेक देशांनी इराणी तेल विकत घ्यायला सुरुवात केली. तेलाची टंचाई भासू नये, यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी भारताने तेल खरेदी सुरु केली आहे. या दरम्यान मीडियामध्ये एक बातमी आली. एक इराणी तेल जहाज भारताच्या दिशेने येत होतं. पण पेमेंटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे अचानक ते जहाज चीनच्या दिशेने वळलं. आता यावर सरकारकडून उत्तर आलं आहे.

इराणी कच्चा तेलाने भरलेला टँकर पेमेंट संबंधित समस्येमुळे भारताच्या वडीनार येथून चीनच्या दिशेने वळवला ही बातमी आणि सोशल मिडिया पोस्ट चुकीची आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. भारत 40 पेक्षा जास्त देशांकडून कच्चं तेल आयात करतो. कंपन्यांना त्यांच्या व्यापाराच्या आधारावर वेगवेगळे सोर्स आणि ठिकाणाहून तेल खरेदीचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. मध्य पूर्वेतून तेल वाहतुकीत अडथळे येत असले तरी भारताने आपल्या कच्चा तेलाची गरज पूर्ण केली आहे. यात इराणी तेल खरेदीचा सुद्धा समावेश आहे.

बिल ऑफ लँडिंग काय असतं?

पेमेंटच्या समस्येमुळे भारताच्या दिशेने येणारं जहाज चीनच्या दिशेने वळलं ही अफवा आहे. इराणी कच्चा तेलाच्या आयातीत पेमेंटशी संबंधित काही समस्या नाही. भारताकडे येणारं जहाज चीनच्या दिशेने वळलं यातही काही तथ्य नाहीय. जहाज वळवण्याचे जे दावे केले जातायत, त्यात तेलाचा व्यापार कसा चालतो हे लक्षात घेतलेलं नाही. बिल ऑफ लँडिंगमध्ये जहाजातून माल उतरवण्यासाठी संभाव्य बंदरांची नाव लिहिलेली असतात. समुद्रातील कार्गो व्यापार अधिक चांगला सहज व्हावा यासाठी ऑपरेशनल फ्रीडमच्या आधारावर जहाजं मध्येच आपला मार्ग बदलू शकतात.

पेट्रोलियम मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती

पुढील काही महिन्यांसाठी भारताची कच्चा तेलाची गरज भागेल इतकी व्यवस्था केली आहे असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलं आहे. LPG च्या बाबतीतही काही चुकीचे दावे केले आहेत. सी बर्ड हे LPG भरलेलं जहाजं 2 एप्रिलला भारताच्या मँगलोर बंदरात पोहोचलं. त्यात 44 TMT इराणी LPG होता.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?