AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : दिवसाची सुरुवात कशी करावी? पाहा चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी केवळ नातेसंबंध कसे असावेत? याबद्दलच लिहिलेलं नाही तर व्यक्तीची दिनचर्या कशी असावी? या संदर्भात देखील मार्गदर्शन केलं आहे.

Chanakya Niti : दिवसाची सुरुवात कशी करावी? पाहा चाणक्य काय सांगतात?
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 11, 2026 | 8:42 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये फक्त मानवी जीवनातील नातेसंबंधांवरच लिहिलेलं नाही, अथवा फक्त माणसाने आपल्या आयुष्यात आर्थिक नियोजन कसं करावं? एवढंच सांगितलं नाही तर चाणक्य हे आपल्या आरोग्याप्रति देखील प्रचंड जागृत होते, असं त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामधून दिसून येतं. चाणक्य म्हणतात तुमच्याकडे भलेही एकवेळ पैसा नसेल तरी चालेल परंतु तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही पैसा कधीही कमावू शकतात. तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकतात. परंतु जर तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, मात्र आरोग्य नाही, अशावेळी मात्र तुम्ही कधीही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत. तुमच्या उत्तम आरोग्याचं रहस्य हे तुमच्या दिनचर्येत दडलं आहे, असं चाणक्य सांगतात. तसेच मानसाने दिवसाची सुरुवात कशी करावी? याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

रोज सकाळी उठा – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर आयुष्यात कायम आरोग्यदायी राहायचं असेल तर सकाळी लवकर झोपेतून उठण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. माणसाने नेहमी सकाळी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठतो, असा व्यक्ती आयुष्यभर निरोगी आणि उत्साही राहतो. असा व्यक्ती कधीही लवकर आजारी पडत नाही, तसेच जो व्यक्ती रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. त्याच्या मनात दिवसभर उत्साह टिकून राहातो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कामाचं नियोजन – चाणक्य म्हणतात सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात प्रथम इश्वराचं नामस्मरण करा, त्याचे आभार माना आणि त्यानंतर तुम्हाला आज दिवसभरात कोणती कामं करायची आहेत? तसेच त्यांचा प्राधान्य क्रम काय आहे? कोणती कामे आधी करायची आहेत? कोणती नंतर करायची आहे? या सर्व गोष्टीचं नियोजन करा आणि त्यानुसार कामाला लागा.

व्यायाम – चाणक्य म्हणतात उत्तम शरीर ही कोणत्याही मानसाची फार मोठी संपत्ती असते, तुम्ही व्यायामातून आरोग्य कमावू शकतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर थोडा तरी वेळ हा व्यायामाला दिलाच पाहिजे. व्यायामामुळे तुमचं शरीर सशक्त राहतं, कामातील उत्साह वाढतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा