AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishi Sunak : ब्रिटनवरती भारतीयच राज कारणार? ऋषी सुनक यांना दुसऱ्या फेरीतही सर्वाधिक मतं

पहिल्या फेरीत ऋषी सुनक यांना 25 टक्के मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर पेनी मॉर्डंट यांना 19 टक्के मते मिळाली.

Rishi Sunak : ब्रिटनवरती भारतीयच राज कारणार? ऋषी सुनक यांना दुसऱ्या फेरीतही सर्वाधिक मतं
ब्रिटनवरती भारतीयच राज कारणार? ऋषी सुनक यांना दुसऱ्या फेरीतही सर्वाधिक मतंImage Credit source: Aajtak
| Updated on: Jul 14, 2022 | 8:13 PM
Share

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन (Boris Johnson) यांना राजीनामा द्यावा लागल्याने पुन्हा निवडणुकांचे वारे वाहत आहे. यात भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता वाढली आहे. कारण मतमोजणीच्या दुसऱ्या राऊंडमध्येही (Second Roud Voting) त्यांचं पारडं जड राहिलं आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत आधी त्यांनी मोठी आघाडी घेतली तर आता दुसऱ्या फेरीतही त्यांनी मोठी आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पहिल्या फेरीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली असून, दोन उमेदवारही बाद झाले आहेत. पहिल्या फेरीत ऋषी सुनक यांना 25 टक्के मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर पेनी मॉर्डंट यांना 19 टक्के मते मिळाली.  एलिमिनेशन फेरीत नदीम जाहवीला सात टक्के आणि जेरेमी हंटला पाच टक्के मिळाले. ही संख्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वात कमी होती, ज्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले. आता ही आघाडी शेवटपर्यंत अशी राहणार का? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठारणार आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

सुनक सुरूवातीपासूनच आघाडीवर

ब्रिटनचे पुढील पंतप्रधान निवडण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी नामांकनांची प्रारंभिक फेरी संपल्यानंतर दोन भारतीय वंशाचे खासदार-माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन-आठ दावेदारांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यात आता सुनक हे चांगलेच आघाडीवर आहेत.

नव्या पंतप्रधानाची निवड 5 सप्टेंबरला

ऋषी सुनक यांना बहुतांश खासदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या प्रचाराची सुरुवात करताना 42 वर्षीय सुनक म्हणाले, “मी एक सकारात्मक मोहीम चालवत आहे ज्यामध्ये माझ्या नेतृत्वामुळे पक्ष आणि देशाला काय फायदा होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित केले जाते.” मूळ गोव्यातील सुएला ब्रेव्हरमन, आता ब्रिटीशमध्ये ऍटर्नी जनरल आहेत. मंत्रिमंडळ आणि 2015 पासून खासदार आहेत. नामांकन प्रक्रिया पूर्ण होण्याच्या काही वेळापूर्वी दोन पाकिस्तानी वंशाचे उमेदवार माजी आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि परराष्ट्र कार्यालय मंत्री रहमान चिश्ती यांनी आपले नामांकन मागे घेतले कारण ते 20 खासदारांचा पाठिंबा मिळवू शकले नाहीत. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची निवड 5 सप्टेंबरला होणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.