Next PMRishi Sunak :भारतीय वंशाचे ऋषि सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान; व्हिडिओच्या माध्यमातून थेट प्रचार

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या ऋषी सुनक यांनी स्वत:चा जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ब्रिटनच्या नागरीकांना साद घातली आहे. चला पुन्हा एकदा विश्वास निर्माण करू, अर्थव्यवस्था पुन्हा बांधू आणि देशाला पुन्हा एकत्र करू अशी घोषणा ऋषी सुनक यांनी या व्हिडिओत केली आहे.

Next PMRishi Sunak :भारतीय वंशाचे ऋषि सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान; व्हिडिओच्या माध्यमातून थेट प्रचार
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 11:52 PM

लंडन : बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा (Prime Minister Of Britain) राजीनामा (Resign) दिल्यानंतर आता नवे पंतप्रधान कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशीय ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) आघाडीवर आहेत. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यास ही भारतासाठी अभिमानाची (Proud Of India) बाब ठरू शकते. ब्रिटीश मीडियानुसार (British Media) ऋषि सुनक ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ऋषी सुनक यांनी स्वत: आपणच ब्रिटनचे पंतप्रधानपद मिळवणार असल्याची घोषणा केली आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या ऋषी सुनक यांनी स्वत:चा जोरदार प्रचार सुरु केला आहे. सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी ब्रिटनच्या नागरीकांना साद घातली आहे. चला पुन्हा एकदा विश्वास निर्माण करू, अर्थव्यवस्था पुन्हा बांधू आणि देशाला पुन्हा एकत्र करू अशी घोषणा ऋषी सुनक यांनी या व्हिडिओत केली आहे.

महाराष्ट्रा प्रमाणेच ब्रिटनमध्ये झाले मोठे राजकीय बंड

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन(PM Boris Johnson)यांच्या कंजर्वेटिव पक्षात मोठं बंड झाले. 4 केंद्रीय मंत्र्यासह 40 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले आणि त्यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या विरोधात अविश्वास एवढा वाढला की थेट सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले. सर्व मंत्र्यांनी धडाधड आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे दिले. 36 तासांपूर्वी ज्यांना मंत्रिपद देण्यात आले होते, त्या मिशेल डोनेलन यांनीही राजीनामा दिला. बुधवारी संध्याकाळपर्यंत 17 कॅबिनेट, 12 सचिव आणि परदेशात नियुक्त केलेल्या 4 प्रतिनिधींनी राजीनामे दिले. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार पडले आणि त्यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले. बोरिस यांची कार्यपद्धती, लॉकडाऊनच्या काळात करण्यात आलेली पार्टी आणि काही नेत्यांचा सेक्स स्कँडलमधील सहभाग असे मुद्दे उपस्थित करत मंत्र्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि मंत्रीपदाचे राजीनामे दिले.

सुनक यांच्या नावाला सर्वाधिक पसंती

ब्रिटनचा नवा पंतप्रधान कोण असणार? याबाबत ‘इप्सॉस’ने एक सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये 31 टक्के ब्रिटिश नागरिकांनी पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांच्या नावाला पंसती दिली आहे. ऋषी सुनक हे पंतप्रधान म्हणून चांगले काम करतील असे ब्रिटिश नागरिकांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदासाठी इच्छूक असणाऱ्या इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा ऋषी सुनक यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यामुळे लवकरच आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात. ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. जर ते ब्रिटनेच पंतप्रधान झाले तर ब्रिटनवर भारतीयांचे राज्य आले असे म्हटले जाऊ शकते. तेथील घटनेनुसार येत्या ऑक्टोबरपर्यंत सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून पंतप्रधानपदासाठी नेता निवडण्यात येणार आहे.

नारायण मूर्ती यांचे जावई

ऋषी सुनक यांचे आईवडील भारतीय वंशाचे होते. पण त्याचे कुटुंब पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झाले. त्यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएचे शिक्षण घेतले. ऋषी सुनक इन्फोसिसचे (Infosis) सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murti) यांचे जावई आहेत. मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. 2015 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले.

ऋषी सुनक यांच्याविषयी

बोरिस जॉन्सन यांच्या निवडणूक प्रचारात ऋषी यांची भूमिका महत्त्वाची होती. प्रेस ब्रिफिंगमध्येही सरकारचा चेहरा म्हणून बऱ्याचदा तेच सामोरे येत असत. अनेक वेळी टीव्हीवरील चर्चांमध्ये बोरिस यांच्या ऐवजी ऋषीच चर्चेला आणि प्रश्नांना सामोरे जात असत. याच्याविरोधात कामगार पक्षाने अनेकदा प्रश्नही उपस्थित केले होते. नेमके पंतप्रधान आहेत तरी कोण असा प्रश्नही विचारण्यात येत असे.

अक्षता या इंग्लंडच्या नागरिक नाहीत

ऋषी यांच्या पत्नी अक्षता यांच्याकडे इग्लंडचे नागरिकत्व नाही. इंग्लंडच्या कायद्याप्रमाणे, देशाबाहेर होणाऱ्या कमाईवर त्यांना कर द्यावा लागत नाही. त्यामुळे सुनक आणि अक्षता यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कोरोनाच्या काळात सुनक यांनी चांगले कार्य केले असले तरी या काळात इंग्लंडच्या नागरिकांवर त्यांनी करही आकारला असे सांगण्यात येते.

पंतप्रधानपदासाठी का आहेत पहिली पसंत

ऋषी सुनक यांनी कोरोना काळात देशाला आर्थिक मंदीतून सावरले. सर्व वर्गांना खूश ठेवण्यात ते यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येते २०२० साली हॉटेल इंडस्टरीला इट आऊट टू हेल्प या योजनेंतर्गत सव्वा पंधरा हजार कोटींची मदत दिली. कर्मचारी आणि स्वयंरोजगार करणाऱ्यांना २०२१ साली दोन लाख रुपयांचा सहाय्यता निधी दिला. देशातील पर्यन व्यवसायाला उभारी देण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.