Romita Shetthi : पाकिस्तानच्या इम्रान खानला पैसा पुरवणारी रोमिता शेट्टी भारतीय? सिंगापूरहून येणाऱ्या डॉलरचं रहस्य काय?

रोमिता व्यतिरिक्त इंदर दोसांझ, विरल लाल, मायकेल लेन, सायमा अश्रफ, मुर्तजा लोखंडवाला, अबू बकर वकील, चिरंजीत सिंग, वर्षा लथरा आणि इतरांची नावं या यादीत आहेत.

Romita Shetthi : पाकिस्तानच्या इम्रान खानला पैसा पुरवणारी रोमिता शेट्टी भारतीय? सिंगापूरहून येणाऱ्या डॉलरचं रहस्य काय?
पाकिस्तानच्या इम्रान खानला पैसा पुरवणारी रोमिता शेट्टी भारतीय? सिंगापूरहून येणाऱ्या डॉलरचं रहस्य काय?
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

Aug 03, 2022 | 8:04 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आता नव्या अडचणीत सापडले आहेत. आठ वर्षे जुन्या परदेशी निधी प्रकरणात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. इम्रान खान 34 परदेशी नागरिक आणि 351 विदेशी कंपन्यांकडून निधी मिळवल्याप्रकरणी दोषी सिद्ध झाले आहेत. या प्रकरणात नाव असलेल्या 34 जणांमध्ये भारतीय वंशाच्या एका महिलेचेही नाव आहे. रोमिता शेट्टी (Romita Shetthi) हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला निधी देण्याच्या प्रकरणात भारतीय-अमेरिकन महिला रोमिता शेट्टीचे असल्याचा दावा करण्यात येत आहे. रोमिता व्यतिरिक्त इंदर दोसांझ, विरल लाल, मायकेल लेन, सायमा अश्रफ, मुर्तजा लोखंडवाला, अबू बकर वकील, चिरंजीत सिंग, वर्षा लथरा आणि इतरांची नावं या यादीत आहेत.

किती पैसा इम्रान खान यांना दिला?

मात्र सर्वाधिक चर्चा रोमिता शेट्टींच्या नावाची होत आहे. कारण रोमिता शेट्टी या भारतीय असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये केला जात आहे.निवडणूक आयोगाने निकालात रोमिता शेट्टींचा तपशील तसेच इतर व्यक्तींनी दिलेल्या पैशांची नोंद केली आहे. यात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की पीटीआय पाकिस्तानला भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यावसायिक महिला असलेल्या रोमिता शेट्टी यांच्या निधीचा फायदा झाला आहे. निवडणूक आयोगाने निकालात पुढे लिहिले की रोमिता शेट्टीने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाला 13,750 डॉलर दिले आहेत, जे पाकिस्तानी कायद्याचे उल्लंघन करतात.

रोमिता बारतीय असल्याचा दावा

दुसरीकडे पाकिस्तानी पत्रकार हमीर मीर यांनी ट्विटरवर दावा केला आहे की भारतीय नागरिक रोमिता सेट्टी यांनी इम्रान खानच्या पक्ष पीटीआयला 13,750 अमेरिकन डॉलर्सचा निधी दिला आहे. हे पैसे सिंगापूरमधून पीटीआयला देण्यात आले आहेत. मात्र कागदोपत्री रोमिता शेट्टी भारतीय नाही. रोमिता शेट्टी ही भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक आहे. रोमिताच्या पतीचे नाव नसीर अहमद आहे. जे पाकिस्तानी वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत.

रोमिता नेमकी कोण आहे?

रोमिता एक व्यावसायिक महिला आहे. ब्लूमबर्गवर प्रकाशित प्रोफाइलनुसार ती डीए कॅपिटलची मॅनेजमेंटमधील पार्टनर आहे. ही कंपनी इतर बाबींबरोबरच आपल्या ग्राहकांना गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन याबाबत सल्ला देण्यासाठी ओळखली जाते. रोमिता आणि तिचा पती नसीर अहमद यांचा विवाह 1997 मध्ये मॅनहॅटनमध्ये झाला होता. रोमिताचे पती नासिर अहमद हे डिमाओ कॅपिटल एलएलसी (डीए कॅपिटल कंपनी) चे व्यवस्थापकीय संचालक आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें