Russia-Ukraine War : ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, 24 तासात 524 Air Strike, पुतिन खवळले
Russia-Ukraine War : मागच्या तीन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. हे युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु आहेत. पण हे सगळं इतक्यात थांबेल असं वाटत नाही. रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात भीषण असा हल्ला केला आहे. पुतिन यांचा कोप युक्रेनला झेलावा लागला. रशियाची हवाई शक्ती युक्रेनवर अक्षरक्ष: तुटून पडली.

रशिया-युक्रेन युद्ध रोखणं हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळी पावलं उचलून रशियाला आर्थिक दृष्टया कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतावर लावलेला 50 टक्के टॅरिफ हा त्याचाच एक भाग आहे. रशियन कंपन्यांवर आर्थिक निर्बंध सुद्धा लादले. पण एवढ करुनही हे युद्ध रोखणं ट्रम्प यांना जमेल असं वाटत नाही. कारण मागच्या 24 तासात रशियाने युक्रेनवर 524 हवाई हल्ले केले आहेत. रशियाने युक्रेनच्या तीन शहरांवर अक्षरक्ष: दारुगोळ्याचा वर्षाव केला. संपूर्ण युक्रेन रशियाच्या या हल्ल्यांनी हादरुन गेला आहे. मागच्या काही महिन्यातील रशियाने युक्रेनवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुतिन यांनी हल्ला युक्रेनवर केला. पण संदेश नाटो देशांना दिला. युक्रेनवर इतका मोठा विध्वंसक हल्ला करुन पुतिन यांनी नाटोला शेवटचा इशारा दिला आहे. रशियान सीमेजवळ युद्धाभ्यास बंद झाला नाही, तर पुढच्या काही दिवसात महायुद्ध निश्चित आहे.
आधी जर्मनी मग फ्रान्सने रशिया विरोधात युद्धाची घोषणा केली आहे. रशिया विरुद्ध युद्धाची घोषणा करुन या देशांनी पुतिन यांना चिथावणी देण्याचं काम केलं. त्यानंतर रशियन बॉर्डरजवळ नाटो देशांनी युद्धाभ्यास सुरु केल्यानंतर पुतिन यांनी युक्रेनवर भयानक हल्ले करुन नाटोला इशारा दिला. युक्रेन-रशिया युद्धात नाटो देशांनी थेट हस्तक्षेप केला, तर परिणाम यापेक्षा वाईट होतील हे पुतिन यांनी आधीच म्हटलं आहे. आताची त्यांची कारवाई तशीच आहे.
सकाळपर्यंत हे हवाई हल्ले सुरु होते
युक्रेनी सैन्यानुसार, रशियाने 18 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरु केलेत. 19 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत हे हवाई हल्ले सुरु होते. रशियाने युक्रेनच्या तीन शहरांना टार्गेट केलं. कीव, टेरनोपील आणि खारकीव या तीन शहरांवर रशियाची हवाईशक्ती तुटून पडली. 46 मिसाइल्स आणि 476 ड्रोनव्दारे हल्ले करण्यात आले. रशियाने थेट क्रूझ मिसाइल्स डागली. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यावेळी एक ड्रोन रोमानियाच्या एअरस्पेसमध्ये घुसलं.
दोन युरोफायटर टायफून आणि दोन F-16 फायटर जेट्स हवेत झेपावली
त्यानंतर रोमानियाकडून तातडीने दोन युरोफायटर टायफून आणि दोन F-16 फायटर जेट्स हवेत झेपावली. पोलंडचा रिजेशो आणि ल्यूबलीन एअरपोर्ट काही वेळासाठी बंद करावा लागला. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यात आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने जाणुनबुजून गृह, शिक्षण सुविधा आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं. जास्तीत जास्त नागरिकांना मारणं हे त्यांचं लक्ष्य होतं असा दावा युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी केला.
