रिंग ऑफ फायर! निसर्गाची अशी माया ज्याने संपूर्ण जग संकटात; क्षणात होऊ शकतो विध्वंस!
रिंग ऑफ फायर हे प्रशांत महासागरात पसरलेले ज्वालामुखी आणि भूकंपीय क्षेत्र आहे. नकाशावर पाहायचं झालं तर हे क्षेत्र एका रिंगप्रमाणे दिसते.

रशियात गेल्या सहा दशकांमधील सर्वात मोठा आणि शक्तिशाल भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल आहे. हा भूकंप होताच रशियात त्सुनामी आली. थेट जपानपर्यंत त्सुनामीच्या लाटा दिसून आल्या. दरम्यान, आता निसर्गाच्या या रौद्र रुपानंतर ‘रिंग ऑफ फायर’ची सगळीकडे चर्चा होत आहे. रिंग ऑफ फायर नेमकं काय आहे? रिंग ऑफ फायर आणि भूकंपाचा संबंध काय आहे? हे जाणून घेऊ या…
रशियात मोठा भूकंप
रशियात याआधी 1952 साली अशा प्रकारचा मोठा भूकंप आला होता. त्यानंतर आता एवढ्या तीव्रचेचा हा भूकंप अनेक दशकांनी पाहायला मिळालेला आहे. या भूकंपामुळे जपान तसेच अमेरिकेलाही त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. रशियाच्या वैज्ञानिकांनुसार हा भूकंप खूपच शक्तीशाली होता. तर या भूकंपामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीचा फटका हा जपान आणि अमेरिकेलाही बसण्याची शक्यता आहे.
रिंग ऑफ फायर नेमकं काय आहे?
रिंग ऑफ फायर हे प्रशांत महासागरात पसरलेले ज्वालामुखी आणि भूकंपीय क्षेत्र आहे. नकाशावर पाहायचं झालं तर हे क्षेत्र एका रिंगप्रमाणे दिसते. त्यामुळेच त्याला रिंग ऑफ फायर म्हटले जाते. हे संपूर्ण क्षेत्र टेक्टॉनिक प्लेट्सपासून तयार झालेले आहे. त्यामुळेच या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये हाचलाच झाली की भूकंप येतो. 90 टक्के भूकंपांचे कारण रिंग ऑफ फायर असल्याचे म्हटले जाते.
75 टक्के ज्वालामुखी हे याच भागात सक्रीय
रिंग ऑफ फायरची सुरुवात अमेरिकेच्या दक्षिणी भागापासून होते. हे भूकंपीय आणि ज्वालामुखीचे क्षेत्र न्यूझीलंडपर्यंत पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीवरच्या एकूण ज्वालामुखींपैकी साधारण 75 टक्के ज्वालामुखी हे याच भागात सक्रीय आहेत. त्यामुळेच नैसर्गिक विध्वंसासाठी रिंग ऑफ फायर फार महत्त्वाची आहे. रिंग ऑफ फायरमध्ये एकूण 452 ज्वालामुखी सक्रीय आहेत. त्यामुळे या रिंग ऑफ फायर क्षेत्रात काही अघटीत घडलं तर हे ज्वालामुखी रौद्र रुप धारण करू शकतात. तसेच मोठा भूंकप झाला तर त्यात अनेक देशांत मोठा विध्वंस घडू शकतो, असे सांगितले जाते.
कोणकोणते देश संकटात?
रिंग ऑफ फायरमुळे अनेक देश त्सुनामी आणि भूकंपाच्या विळख्यात असतात. या देशांत कधीही भूकंप होण्याची शक्यता असते. पेरू, कोस्टा रिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, रशिया, चिले, इक्वेडोर, पापुआ, इंडोनेशिया, न्यूझीलंड, जपान, फिलीपाईन्स आणि ऑस्ट्रेलिया हे प्रामुख्याने रिंग ऑफ फायरच्या क्षेत्रात येतात.
