AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासारख्या शक्तीशाली देशाने… इराण आणि अमेरिका युद्धात रशियाकडून भारताचे नाव घेत थेट…

इराण आणि अमेरिका युद्धाचा अनेक देशांना फटका बसताना दिसत आहे. युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. त्यामध्येच आता रशियाने भारताबद्दल मोठे विधान केले आहे. रशिया सध्या भारताला बाजार भावाप्रमाणेच कच्चे तेल विकत आहे.

भारतासारख्या शक्तीशाली देशाने... इराण आणि अमेरिका युद्धात रशियाकडून भारताचे नाव घेत थेट...
russia and india
| Updated on: Mar 19, 2026 | 9:39 AM
Share

अमेरिका आणि इराण युद्धाचा भडका उठला आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर करण्यात आला. त्यानंतर इराणने मोठे क्षेपणास्त्र इस्त्रायलच्या दिशेने टाकली. थेट ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्याठिकाणीही मोठे हल्ले इराणकडून करण्यात आले. या युद्धात फक्त या तीनच देशांचे नुकसान होत नाही जगातील सर्वच देशांना फटका बसत आहे. हे युद्ध आता थेट तेलाकडे वळले आहे. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित करायची असल्याचे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. मात्र, इराण मागे हटत नाही. त्यामध्येच मोठी चूक करून इराणच्या गॅस संबंधित सुविधांवर हल्ला करण्यात आला, त्यानंतर आता इराण अधिक घातक बनला आहे. इराणकडून आखाती देशांच्या तेल प्रकल्पांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली.

अनेक प्रयत्न करूनही होर्मुज मार्ग सुरक्षित होत नसल्याने जगातील अनेक देश संकटात आहेत. गॅस आणि तेलाचा मोठा तुटवडा आहे. भारतातही एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबले पाहिजे, कारण हे युद्ध अधिक काळ चालू राहिले तर अत्यंत घातक परिणाम होतील. इराणकडून तीन अटी हे युद्ध थांबवण्याकरिता ठेवण्यात आल्या आहेत.

रशिया सध्याच्या घडीला भारताला बाजार भावाप्रमाणेच तेल विकत आहे. कोणतीही सवलत युद्धाचा काळात भारताला देत नाही. भारत आणि रशियाचे संबंध सध्या फार काही चांगल्या स्थितीत नाहीत. यादरम्यानच भारताबद्दल मोठे विधान रशियाकडून करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्ध भारत थांबू शकतो, असे मोठे विधान नुकताच रशियाकडून करण्यात आले.

रशियाचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याकरिता भारताची भूमिका महत्वाची असणार आहे. प्रवक्ते जाखारोवा यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत गंभीर संकट उभे आहे. काही जिम्मेदार देशांनी पुढे येत हे  थांबवणे आवश्यक आहे. मला वाटते की, भारतासारख्या महाशक्ती देशाने भूमिका मांडली पाहिजे. खास गोष्ट म्हणजे भारताने सतत युद्ध संपवण्याबद्दल चर्चा करण्याबद्दलही भाष्य केले आहे.

Follow Us
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले