जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांचे अण्वस्त्र चाचणीचे आदेश, रशियाचा मोठा इशारा, आता…
डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक धक्कादायक निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट अण्वस्त्र चाचण्या करण्याचे आदेश दिल्याने जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्ये आता रशियानेही मोठा इशारा दिलाय.

युक्रेन आणि रशिया युद्धात अमेरिका पडल्याने हे युद्ध थांबवण्याऐवजी अधिक भडकताना दिसतंय. रशियाने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, आम्ही फक्त रशियासोबत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी पुढाकार घेणारे देश आता त्यांचे शस्त्रास्त्रांचे साठे वाढवण्याबद्दल जाहिरपणे भाष्य करत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अण्वस्त्र चाचण्यांबद्दल मोठे विधान करत थेट अण्वस्त्र चाचण्या करण्याचे आदेश दिली. आम्ही काही चाचण्या करणार आहोत, इतर देशही हे करत आहेत. रशियाने अमेरिकेसोबत केलेला अण्वस्त्रांबाबतचा करार मोडला आहे. त्यानंतर अमेरिकेनेही आपली भूमिका बदलत अण्वस्त्र चाचण्या करण्याचे निर्णय घेतले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला इशारा देत म्हटले की, आम्ही अण्वस्त्र चाचण्या करणार आहोत, तसे आदेशही देण्यात आली. आता रशियाने देखील मोठा इशारा देत अमेरिकेला प्रतिक्रिया दिलीये. रशियाने म्हटले की, अमेरिकेने कोणते पाऊस उचलले यावर रशिया देखील आपली भूमिका स्पष्टपणे पुढील मांडेल. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचणी घेत असल्याचे आपल्या निवेदनात स्पष्ट म्हटले.
त्यांनी पुढे बोलताना म्हटले की, मुळात म्हणजे सर्व देश आपली सुरक्षा प्रणाली विकसित करत आहेत. पण अण्वस्त्र चाचण्या नाही. पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले की, अमेरिकेने जर अण्वस्त्र चाचणीवरील बंदी हटवली तर आ्म्ही देखील परिस्थिती बघून पाऊले उचलू. 26 ऑक्टोबर रोजी रशियाने क्रूझ क्षेपणाशास्त्रीची यशस्वी चाचणी केली. ज्यानंतर अमेरिकेने देखील अण्वस्त्र चाचणी करण्यास मंजुरी दिली.
आता जे देश अगोदर अण्वस्त्र चाचणीवरील बंदीबाबत बोलत तेच अण्वस्त्र चाचण्या करण्यावर भाष्य करत असल्याने मोठा धोका निर्माण झालाय. रशिया आणि युक्रेन युद्ध चांगलेच टोकाला पोहोचल्याचे बघायला मिळतंय. रशियाने काही दिवसांपूर्वीच घातक अशा क्रूझ क्षेपणाशास्त्री यशस्वी चाचणी केली. दुसरीकडे युक्रेन रशियाविरोधात लढण्यासाठी घातल हत्याराची मागणी करताना दिसतोय. रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी त्यांनी अनेक देशांवर दबाव आणलाय.
