AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणला ‘हा’ देश पुरवणार अणुबॉम्ब, अमेरिकेचे धाबे दणाणले

ट्रम्प यांनी अमेरिकेला एका नवीन युद्धात ढकलले आहे. त्यामुळे आता पुढे इराण काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! इराणला 'हा' देश पुरवणार अणुबॉम्ब, अमेरिकेचे धाबे दणाणले
Iran and USA warImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 23, 2025 | 1:44 PM
Share

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सोमवारी (23 जून 2025) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी पुतिन यांचे निकटवर्ती आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया..

ट्रम्प यांनी आणखी एक युद्ध सुरू केले: मेदवेदेव

रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर आरोप केला की, त्यांनी अमेरिकेला एका नव्या युद्धात ढकलले आहे. मेदवेदेव म्हणाले, “शांतता प्रस्थापित करणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून आलेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी नवे युद्ध सुरू केले आहे.”

वाचा: जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा हल्ला! अमेरिकेने इराणवरच्या या एका स्ट्राइकसाठी किती खर्च केला?

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करताना रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, या हल्ल्यात इराणच्या पायाभूत सुविधांचे विशेष नुकसान झाले नाही किंवा केवळ किरकोळ नुकसान झाले आहे. ते म्हणाले, “आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो की, इराण भविष्यात अणवस्त्रांचे उत्पादन सुरू ठेवेल.”

अनेक देश इराणला अणवस्त्रे पुरवण्यास तयार: दिमित्री मेदवेदेव

दिमित्री मेदवेदेव यांनी दावा केला की, “अनेक देश इराणला थेट आपली अणवस्त्रे पुरवण्यास तयार आहेत.” मात्र, ते कोणत्या देशांबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. मेदवेदेव पुढे म्हणाले की, इस्रायलची लोकसंख्या आता सतत धोक्यात जगत आहे, देशाच्या अनेक भागांत स्फोट होत आहेत. ते म्हणाले, “अमेरिका आता एका नव्या संघर्षात अडकली आहे, ज्यात जमिनीवर कारवाई होण्याची शक्यता दिसत आहे.”

त्यांनी असेही म्हटले की, या हल्ल्यांमुळे इराण राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. रशियन नेते म्हणाले, “इराणचे राजकीय शासन टिकून आहे आणि कदाचित ते आणखी मजबूत झाले आहे. लोक देशाच्या आध्यात्मिक नेतृत्वाभोवती एकत्र येत आहेत, ज्यात ते लोकही सामील आहेत जे पूर्वी याबाबत उदासीन किंवा विरोधी होते.”

आता अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही: अराघची

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सध्याच्या परिस्थितीत तेहरान अणुकरार चर्चेत पुन्हा सहभागी होईल, हे नाकारले आहे. ते म्हणाले, “आम्ही कूटनीतीच्या मध्यात होतो. आम्ही अमेरिकेशी चर्चे करत होतो, तेव्हा इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला.” ते म्हणाले की, अमेरिकेच्या हल्ल्याच्या अवघ्या दोन दिवस आधी जिनिव्हामध्ये युरोपीय मध्यस्थांशी चर्चा सुरू होती. याच दरम्यान अमेरिकेने आमच्या अणुस्थळांवर हल्ला केला. इराणने नव्हे, तर अमेरिकेनेच विश्वासघात केला आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन