AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine War : युद्धासमयी एकटा पडला युक्रेन?, अद्याप अमेरिका व नाटोने केली नाही मदत! जाणून घ्या कारणं…

युद्ध सुरू होऊन दोन दिवस झाले आहे, तरीही अद्याप अमेरिकेकडून व नाटो कडून कोणतीच मदत मिळाली नाही. यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्‍की यांनी एक वक्तव्य केले आहे ,त्यामध्ये असे म्हटले की, या संकटसमयी प्रत्येकाने आम्हाला एकटे पाडले आहे. सगळ्यांनी आमची साथ सोडलेली आहे. युरोपीय देश, नाटो आणि अमेरिकाने युक्रेनची मदत का नाही केली?, यामागे नक्की कोणकोणती कारणे आहेत.

Russia Ukraine War : युद्धासमयी एकटा पडला युक्रेन?, अद्याप अमेरिका व नाटोने केली नाही मदत! जाणून घ्या कारणं...
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 26, 2022 | 8:24 PM
Share

नवी दिल्ल्ली : रशियाची सेना यूक्रेन (Ukraine) ची राजधानी कीवमध्ये शिरली आहे. रशियन सेनेने एका एयरबेसवर कब्‍जा देखील केला. यूक्रेनच्या रक्षा मंत्रालयाने दावा केला आहे की, आता पर्यंत झालेल्या युद्धात 1,000 पेक्षा अधिक रशियन सैनिक मारले गेले आहे. या पूर्ण युद्धात यूक्रेन देश एकटा पडला आहे. युद्धा पूर्वी जे देश म्हणजेच अमेरिका (America) आणि यूरोपीय देश (European Countries) यूक्रेनच्या बाजूने बोलत होते, त्यांनी या सगळ्या परिस्थितीतून अंग काढले आहे. युद्ध सुरू होऊन दोन दिवस झाले आहे, तरीही अद्याप अमेरिकेकडून व नाटो कडून कोणतीच मदत मिळाली नाही. यूक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्‍की यांनी एक वक्तव्य केले आहे ,त्यामध्ये असे म्हटले की, या संकटसमयी प्रत्येकाने आम्हाला एकटे पाडले आहे. सगळ्यांनी आमची साथ सोडलेली आहे. युरोपीय देश, नाटो आणि अमेरिकाने युक्रेनची मदत का नाही केली?, यामागे नक्की कोणकोणती कारणे आहेत. चला तर मग जाणून घेऊया, या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल बद्दल…

1 अमेरीकेने का नाही पाठवले आपले सैन्य ?

बीबीसीच्या रिपोर्ट नुसार, अमेरीकेचे राष्‍ट्रपती बाइडन यांनी या आधीच सांगितले होते की, अमेरिकी सैन्य युक्रेन मध्ये पाठवले जाणार नाही. त्याचबरोबर यूक्रेन अमेरीकेचा काही शेजारी राष्ट्र नाही आणि अमेरीकेचे कोणतेही मोठे लष्करी तळ युक्रेनमध्ये नाही. तेलाचा व्यवहार हा दोन देशांमधील राजनैतिक आणि व्यापारी संबंध मजबूत करण्यास महत्त्वाची भूमिका बजावत असतो परंतु या दोन देशांच्या बाबतीत असे काहीच घडत नाही. जर या पद्धतीने विचार करायचा झाल्यास भविष्यात युक्रेन आणि अमेरिका यांचे कोणत्याही व्यापारी संबंध प्रस्थापित होतील असे वाटत नाही. अशा अनेक परिस्थितीकडे पाहूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

2- कोविंड महामारी नंतर आर्थिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न

कोरोना महामारी परिस्थितीमुळे जगभरात आधीच सगळेजण आर्थिक संकटांमध्ये सापडले आहेत. या आर्थिक संकटात युरोपीय देशांचा सुद्धा समावेश आहे.युद्धात मदत करून कोणताही देश स्वतःहून धोका पत्करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये रशियाने या अन्य देशांवर हल्ला केला तर परिस्थिती अजून बिघडू शकते. कदाचित हेच कारण आहे की, युद्धाच्या आधी रशिया देशाविरुद्ध आग ओकणाऱ्या अमेरीका आणि अन्य युरोपीय देशांनी आता नरमाईची पावले उचललेली आहेत.

3- अमेरिका आणि युरोपीय देश या समस्येला जात आहेत सामोरे

अमेरीका आणि युरोपीय देश सध्याच्या वेळी अंतर्गत समस्येला सामोरे जात आहे. या देशांची रेटिंग सध्या खालावलेली आहे.अमेरीका ब्रिटन कॅनडा आणि फ्रान्स मधील प्रमुख आपल्या देशातील अनेक समस्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत ,अशातच हे देश युक्रेनला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही. कॅनडामध्ये वॅक्सिंगमुळे पंतप्रधान ट्रूडो यांच्या विरोधात तिकडचे वातावरण बनले आहे तसेच ब्र‍िटिश पीएम बोरिस जॉनसन यांच्यावर पार्टीगेट प्रकरणामुळे राजीनामा देण्याचा दबाव आहे.

4- नाटो देश कोणताही निर्णय घेत नाहीत ,या देशांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय.

गेल्या अनेक दिवसांपासून नाटो वर सुद्धा अनेक प्रश्न उठवले जात आहेत म्हणूनच पुतिन यांनी हा काळ युक्रेनवर हमला करण्यासाठी निवडला आहे. पुतिन यांच्या धमकीनंतर अनेक देश गोंधळात सापडले आहे व मदत करण्याबाबत त्यांचे एकमत होत नाहीये, म्हणूनच नाटो युक्रेनची मदत करण्यासाठी पुढे येत नाही.

5, अमेरीका नव्या युती – आघाडी मध्ये आहे व्यस्त

एकंदरीत जगभरातील परिस्थिती पाहता अमेरीका स्वतः राजनैतिक आणि स्वबळावर मजबूत राहण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या अमेरिका वेगवेगळ्या आघाडी – युती बनवण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये पश्चिमेकडील देश अमेरीकेसोबत आहेत. क्‍वाड याचे एक उदाहरण देखील आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : ‘शांततेसाठी कोणत्याही प्रकारे योगदान देऊ’; झेलेन्स्की यांच्या मदतीच्या मागणीनंतर पंतप्रधान मोदींचं आश्वासन

Russia Ukraine War Video: रशियानं मिसाईल डागलं, कानठळ्या बसवणारा आवाज पण तरीही मजबूतीचं दुसरं नाव यूक्रेन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.