AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांना जोरदार झटका,अगोदर पुतिन, मग झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना कॉल, रशिया-युक्रेन चर्चेत भारत ‘Invisible partner’

Russia-Ukraine Peace Talk : ट्रम्प यांना अजून एक दणका बसला. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. पण भारत या दोन्ही देशात शांतता आणण्यासाठी अदृश्य शक्ती ठरत आहे. पडद्याआड काय घडत आहे

ट्रम्प यांना जोरदार झटका,अगोदर पुतिन, मग झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना कॉल, रशिया-युक्रेन चर्चेत भारत 'Invisible partner'
पुतिन,झेलेन्स्की,नरेंद्र मोदी
| Updated on: Aug 20, 2025 | 10:40 AM
Share

नवी दिल्लीपासून युक्रेनचे अंतर जवळपास 5000 किलोमीटर इतके आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलास्का येथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सोमवारी त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. दोन्ही देशातील युद्धावर तोडगा काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. पण ही चर्चा निष्फळ ठरली. दोन्ही देशांना शांतता हवी आहे. त्यासाठी दोन्ही देश भारताशी चर्चा करत आहेत. भारताने रशियाकडून कच्चे इंधन खरेदीचा निर्णय घेतल्याने भारताचे महत्त्व वाढले आहे. भारताने शांततेसाठी रशियाचे मन वळवावे अशी मागणी युरोपियन संघाने केली आहे.

युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न कोणी नाकारू शकत नाही. जगातील काही युद्ध थांबवण्यात त्यांनी नक्कीच प्रयत्न केले आहेत. अलास्का येथे त्यांनी पुतिन यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला तर व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि युरोपियन नेत्यांना शांततेसाठी राजी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निदान युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू झाली. ट्रम्प यांनी याविषयीची कोंडी फोडली.

पुतिन-झेलेन्स्की यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन

अलास्का येथून परतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सर्वात अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉल केला. त्यांनी ट्रम्प यांच्याशी शांतता चर्चेची माहिती दिली. मोदींनी युक्रेन संघर्ष हा शांततेने सोडवावा याासाठी भारत वचनबद्ध असल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा झाली.

त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. रशियाकडून वारंवार होत असलेल्या बॉम्ब हल्ल्यावर, विशेषतः झापोरिजियावर झालेल्या हल्ल्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी रशियाच्या इंधन निर्यातीवर प्रतिबंध लावण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे रशियाची आर्थिक बाजू कमकुवत होईल असे ते म्हणाले. भारत दोन्ही देशात शांततेसाठी जो प्रयत्न करत आहे, त्याचे त्यांनी कौतुक केले. तर सप्टेंबरमध्ये UNGA मध्ये भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. आता हे दोन्ही देश अमेरिकाच नाही तर भारताला पण शांतता करारासाठी प्रभावी मानत असल्याचे दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.