Russia Ukraine war : युक्रेन-रशिया युद्धात झपाट्याने बदल, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस पोलंडमध्ये दाखल

मिळालेल्या माहितीनुसार मागच्या पंधरा दिवसांपासून युक्रेनमधून अनेक लोकांनी शेजारच्या देशाचा आसरा घेतला आहे. त्याचबरोबर युक्रेनमधील महत्त्वाची शहर पुर्णपणे ओस पडली आहेत.

Russia Ukraine war : युक्रेन-रशिया युद्धात झपाट्याने बदल, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस पोलंडमध्ये दाखल
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 3:05 PM

युक्रेन(Ukraine) रशिया (Russia) युद्धाचा (war) अनेक देशांना फटका बसत असून ते लवकर संपावं अशी अनेक देशांची इच्छा आहे. सध्या दोन्ही देश नरमाई घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून युक्रेन देशातील अनेक शहर उद्धवस्त झाली आहेत.तसेच रशियाने वारंवार बॉम्ब हल्ले केल्याने तिथं रस्ते, इमारती, महत्त्वाची स्थळ देखील जमीनदोस्त झाली आहेत. दोन्ही देशांच्या सैनिकांचा युद्धात मृत्यू देखील झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की ते यापुढे नाटो सदस्यत्वासाठी युक्रेनवर दबाव आणत नाहीत. झेलेन्स्कीच्या या विधानानंतर युद्ध लवकरच संपेल, असे मानले जात आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत युक्रेनच्या महत्त्वाच्या घटकांचं नुकसान झालं आहे. त्यामध्ये सरकारी कार्यालये, इमारती, अणुऊर्जा प्रकल्प अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे.

कमला हॅरिस पोलंडमध्ये दाखल

या सगळ्यात अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या युक्रेनच्या शेजारील देश पोलंड आणि रोमानियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर ती दोन्ही देशांच्या नेत्यांची भेट घेणार असून युक्रेनच्या शेजारी देशांना अमेरिका कशी मदत करू शकते यावर चर्चा करणार आहे. जो बिडेन प्रशासन युक्रेन आणि नाटो सहयोगींना पाठिंबा देत आहे.कमला हॅरिस यांच्या सध्याच्या दौ-याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अमेरिका आणि पोलंड यांच्यात युक्रेनला लढाऊ विमाने पाठवण्याचा करार रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या दौ-याला विशेष महत्त्व प्रात्प झाले आहे. त्याचबरोबर पोलंडने त्याच्याकडे असलेली युद्धग्रस्त विमानं युक्रेनला द्यावीत अशी अमेरिकेची इच्छा आहे. पण युक्रेन रशियाची थेट लढत नसल्याचे पोलंडने जाहीर केले आहे. युद्धाच्या दरम्यान अनेक लोकांना मदत केली म्हणून कमला हॅरिस यांनी पोलंड सरकारचे आभार मानले आहेत.

रशियाच्या हल्ल्याला घाबरून अनेकांनी सोडला देश

मिळालेल्या माहितीनुसार मागच्या पंधरा दिवसांपासून युक्रेनमधून अनेक लोकांनी शेजारच्या देशाचा आसरा घेतला आहे. त्याचबरोबर युक्रेनमधील महत्त्वाची शहर पुर्णपणे ओस पडली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कीव, खारकीव याचा समावेश आहे. पोलंड, हंगेरी सारख्या देशात अनेकांनी युद्ध पाहून पळ काढला. खारकीव आणि कीवमध्ये रशियाने इतक्या जोरात हल्ला केला की लोकांनी युक्रेनमधली लोकं घाबरली. रशियाने केलेल्या हल्ल्यात अनेक सामान्यांचा मृत्यू झाला आहे.

UP Election Result 2022 Live : ECI कडून 403 जागांचे कल जाहीर, भाजप 247 ठिकाणी पुढे

Punjab Assembly Elections 2022: कोण आहेत आपचे अजित कोहली ज्यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा पराभव केला?

Goa Election Result 2022 | कोणाला 49, कोणाला 55, सर्वाधिक 342, गोव्यात शिवसेना उमेदवारांना किती मतं?

Non Stop LIVE Update
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....