दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये मोठे काही घडणार…भारत-पाकिस्तानबाबत रशियन माध्यमांचा दावा
Pahalgam Terror Attack: रशियन माध्यमांनी दिलेला हा अलर्ट जगभरातील देशांसाठी एक इशारा आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहे, लष्करी हालचाली वाढल्या आहेत, ते पाहिल्यावर परिस्थिती संवेदनशीर झाल्याचे दिसत आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दशतवादी हल्ला मंगळवारी झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. भारताने केवळ राजनैतिक पातळीवर पाकिस्तानपासून संबंध तोडले नाही तर आता लष्करी पातळीवरही प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. या परिस्थितीत रशियाच्या माध्यमांनी भारत आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये काहीतरी मोठे घडणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.
लष्करी संघर्षाकडे वाटचाल
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. रशियन माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही अण्वस्त्रसंपन्न देशांमधील परिस्थिती वेगाने बिघडत आहे. त्यामुळे ‘काहीतरी मोठे घडू शकते’, हा इशारा केवळ प्रादेशिकच नाही तर जागतिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही गंभीर मानला जात आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा लष्करी संघर्षाकडे वाटचाल करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रशियन माध्यमांनी दिलेला हा अलर्ट जगभरातील देशांसाठी एक इशारा आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडून ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहे, लष्करी हालचाली वाढल्या आहेत, ते पाहिल्यावर परिस्थिती संवेदनशीर झाल्याचे दिसत आहे. दक्षिण आशिया एका युद्धाकडे लोटला जात असल्याचे दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे एखादी अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रशियन माध्यमांनी म्हटले आहे.
मोदी यांनी दिला इशारा
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा बिहारमध्ये झाले. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. दहशतवादी आणि दहशतवादी हल्ल्याच्या कट रचणाऱ्या देशांना कल्पनाही करु शकणार नाही, अशी शिक्षा दिली जाईल, असे म्हटले. भारत फक्त कुटनीती स्तरावर कारवाई करुन थांबणार नाही, दहशतवाद्यांचा गड असणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांना उत्तर दिले जाईल. दहशतवाद समूळ नष्ट केला जाईल, असे मोदी यांनी म्हटले.