AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचं आता काही खरं नाही, बलाढ्य रशियाचे राष्ट्रपती पुतीन भारतात येणार, हायलेव्हल मिटिंग…

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत.

पाकिस्तानचं आता काही खरं नाही, बलाढ्य रशियाचे राष्ट्रपती पुतीन भारतात येणार, हायलेव्हल मिटिंग...
vladimir putin and narendra modi
| Updated on: May 06, 2025 | 11:01 AM
Share

Vladimir Putin : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, असे असतानाच आता जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येणार आहेत. एकीकडे भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

रशियाने भारताचं निमंत्रण स्वीकारलं

मिळालेल्या माहितीनुसार व्लादिमीर पुतीन हे लवकरच भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते. याच आमंत्रणाचा रशियाने स्वीकार केला असून याबाबतची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलीनने दिली आहे. रशिया आणि भारत यांच्यात लवकरच द्विपक्षीय शिखर संमेलन होणार आहे. त्यासाठीच मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. रशियाने हे आमंत्रण स्वीकारलं आहे.

पहलगामविषयी रशियाची भूमिका काय?

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाने तीव्र निषेध केला आहे. तसेच दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया कायम भारतासोबत असेही रशियाने स्पष्ट केले आहे. दहशतवादाविरोधात लढाई करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही रशियाने सांगितलंय. यासह भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर कोणत्याही बाहेरच्या शक्तीच्या प्रभाव पडणार नाही, असा विश्वासही रशियाने व्यक्त केला आहे.

पुतीन नेमकं काय म्हणाले होते?

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुतीन यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या. विशेष म्हणजे अशा स्थितीत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले होते. या हल्ल्यातील दोषींना तसेच त्यांच्या समर्थकांना न्याच्या कक्षेत आणलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.

7 मे रोजी होणार मॉक ड्रिल

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...