Iran Israel War : भारताने हुशारी दाखवली, पण आज इराण खामेनेईच्या एका चुकीची किंमत मोजतोय, पुतिनकडून मोठं सिक्रेट उघड
Iran Israel War : इस्रायल-इराण युद्धादरम्यान रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठा खुलासा केला आहे. भारताने जी हुशारी दाखवली, ती इराणच्या खामेनेईला दाखवता आली नाही, त्याची किंमत आज इराण मोजतोय. इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये आतापर्यंत 600 लोक मारले गेले आहेत. इराणची राजधानी तेहरान रडारवर आहे. 2000 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत.

सध्या सुरु असलेल्या युद्धात इराणकडून इस्रायलवर जोरदार पलटवार सुरु आहे. आपण टीव्हीवर इस्रायलच्या तेल अवीव आणि हायफा शहरात इराणी मिसाइल्समुळे किती नुकसान झालय ते पाहतोय. पण इराणला रणनितीक यश मिळवता येत नाहीय. दुसऱ्याबाजूला इस्रायलकडून इराणच्या रणनितीक ठिकाणांवर हल्ले सुरु आहेत. मूळात इस्रायलने इराण विरोधात दोन उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन हे युद्ध पुकारलय. एक म्हणजे इराणमध्ये सत्ता बदल आणि दुसरं इराणची अणू बॉम्ब विकसित करण्याची क्षमता नष्ट करणं. इस्रायलकडून जे लक्ष्य आहे, तशीच कारवाई सुरु आहे. इस्रायलकडून दररोज इराणच्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा सुरु आहे. जेणेकरुन त्यांच्या निर्णय क्षमतेला, रणनितीक दृष्टया कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रेजीम चेंज म्हणजे सत्ता बदल हा उद्देश असल्याने इस्रायल इराणच्या नागरिकांना लक्ष्य करत नाहीय. कारण तसं केल्यास इराणी जनतेच्या मनात इस्रायलबद्दल अजून संताप निर्माण होईल.
या युद्धादरम्यान रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणबद्दल एक सिक्रेट खुलासा केला आहे. मॉस्को स्थित क्रेमलिन येथे पत्रकारांशी बोलताना पुतिन म्हणाले की, “इराणने रशियाची एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेतली असती, तर इस्रायलला तेहरानवर हल्ला करत आला नसता” बीबीसी फारसीनुसार, पुतिन पुढे म्हणाले की, “मी रशियाची एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेण्याबद्दल काही वर्षांपूर्वी इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनेई यांना ऑफर दिली होती. पण ते निर्णय घेऊ शकले नाहीत”
भारताने वेळीच दाखवली हुशारी
पुतिन यांचा इशारा रशियाच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमकडे होता. 2016 साली रशियाने या बद्दल खामनेई सरकारला ऑफर दिली होती. पण इराणने ही सिस्टिम विकत घेण्याची इच्छाशक्ती दाखवली नाही. भारताकडे S-400 सारख अभेद्य सुरक्षाकवच आहे. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने डागलेली बॅलेस्टिक मिसाइल्स हवेतच नष्ट करता आली. त्यावेळी स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिमने S-400 सोबत मिळून उत्तम प्रदर्शन केलं होतं.
हे एक उत्तम शस्त्र
S-400 इंटरसेप्टर मिसाइल प्रणाली आहे. 2007 साली या एअर डिफेन्स सिस्टिमचा रशियन सैन्यात समावेश झाला. ही सिस्टिम शत्रूची मिसाइल्स, ड्रोन आणि फायटर जेट्स 400 किमी अंतरावर असतानाच नष्ट करते. S-400 एक मल्टी-ट्रॅकिंग क्षमता, हाय-रेंज मिसाइल्स आणि वेगात प्रतिक्रिया देणारी डिफेंस सिस्टिम आहे.