AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrayaan-3 vs Luna-25 missions | रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा झटका, अचानक मिशन संकटात

Chandrayaan-3 vs Russia Luna-25 missions | भारताच्या चांद्रयान-3 आधी रशियाच लूना-25 चंद्रावर लँड करणार आहे. नेमकं काय घडलय? या दरम्यान एक मोठी बातमी आली आहे. रशियाच्या चांद्र मोहिमेला झटका बसलाय.

Chandrayaan-3 vs Luna-25 missions | रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा झटका, अचानक मिशन संकटात
Chandrayaan-3 vs Luna-25 missions
| Updated on: Aug 19, 2023 | 11:23 PM
Share

मॉस्को : सध्या भारत आणि रशिया दोन्ही देशांच्या चांद्रमोहिमा सुरु आहेत. दोन्ही देशांची यानं चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत आहेत. भारताच चांद्रयान-3 आणि रशियाच लूना-25 या दोघांमध्ये चंद्रावर पहिलं कोण उतरणार? याची स्पर्धा आहे. या दरम्यान एक मोठी बातमी आली आहे. रशियाच्या चांद्र मोहिमेला झटका बसलाय. अचानक मिशन संकटात पडल्यासारखी स्थिती निर्माण झालीय. रशियाच्या लूना-25 स्पेसक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. रशियाची अवकाश संशोधन संस्था रॉस्कोमॉसने ही माहिती दिली.

चंद्रावर लँड करण्याआधी लूना-25 मिशनची तपासणी सुरु असताना ‘इमरजन्सी’बद्दल समजलं. रॉस्कोमॉसने सांगितलं की, लूना-25 ऑर्बिटमध्ये पाठवण्यासाठी थ्रस्ट करण्यात आलं. त्याचवेळी ऑटोमॅटिक स्टेशनमध्ये इमर्जन्सीची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे स्पेसक्राफ्टच मॅन्यूव्हर होऊ शकलं नाही. म्हणजे कक्षा बदल करता आला नाही.

रॉस्कोमॉसकडून काय सांगण्यात आलं ?

लूना-25 स्पेसक्राफ्टने लँडिंगसाठी ऑर्बिटमध्ये जाण्यआधी असामान्य स्थितीचा सामना केला, असं रॉस्कोमॉसकडून सांगण्यात आलं. लूना-25 स्पेसक्राफ्ट सोमवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फार संशोधन झालेलं नाहीय. या भागात पाणी बर्फाच्या रुपात जमा आहे, असं अनेक वैज्ञानिकांच मत आहे. त्याशिवाय किंमती धातू सुद्धा इथे आहेत. रशिया लूना-25 मिशनच्या माध्यमातून 47 वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्र मोहिम करत आहे.

अजूनही आशा आहे का?

‘ऑपरेशन दरम्यान ऑटोमॅटिक स्टेशनवर असामान्य स्थिती निर्माण झाली. त्यामुळे स्पेसिफाइड पॅरामीटरनुसार मॅन्यूव्हर झालं नाही, असं रशियन स्पेस एजन्सीकडून सांगण्यात आलं आहे. सध्या स्पेशलिस्ट म्हणजेच तज्ज्ञ यावर काम करत आहेत. स्पेन एजन्सीने याशिवाय काही माहिती दिलेली नाही. लूना-25 मिशन 11 ऑगस्टला लाँन्च झालं होतं. सर्वकाही सुरळीत राहीलं, तर लूना-25 22 ऑगस्टला चंद्रावर लँड करेल. म्हणजे चांद्रयान-3 च्या एक दिवस आधी. लूना-25 ने काय डाटा पाठवलाय?

लूना-25 स्पेसक्राफ्टने आधी रिझल्ट दिले आहेत. त्याच विश्लेषण सुरु आहे, असं रॉस्कोमॉसने आधी सांगितलं होतं. स्पेसक्राफ्टने चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो पाठवले. स्पेस एजन्सीने हे फोटो पब्लिश केले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तीसरा खोल खड्डा आहे. त्याचा व्यास 190 किलोमीटर आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.