AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saudi Arabia Bus Accident : अपघातातून वाचला एकमेव भारतीय, बसमध्ये कोणत्या सीटवर बसल्याने प्राण वाचू शकतात

Saudi Arabia Bus Accident : भीषण आगीतून एकच बचावला फक्त एकच भारतीय... बसमध्ये कोणत्या सीटवर बसल्यामुळे वाचले प्राण... अपघातातून बचावलेल्या 24 वर्षीय भारतीय नागरिकाची आई काय म्हणाली...

Saudi Arabia Bus Accident :  अपघातातून वाचला एकमेव भारतीय, बसमध्ये कोणत्या सीटवर बसल्याने प्राण वाचू शकतात
Mohammad Abdul Shoaib
| Updated on: Nov 18, 2025 | 2:35 PM
Share

Saudi Arabia Bus Accident : सौदी अबर येथील मक्का – मदिना हायवेवर झालेल्या गंभीर अपघातात तब्बल 45 भारतीयांनी आपले प्राण गमावले आहेत. हायवेवर हज यात्रेला गेल्या प्रवाशांची बस एका डीझेल ट्रँकरला धडकते आणि बसला आग लागते. बसला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील 18 जणांचे प्राण गेले आहेत. पण नशीब चांगलं म्हणून एका 24 वर्षीय भारतीय तरुणाचे प्राण बचावले आहेत. अपघातात बचावलेल्या एकमेव भारतीयाचं नाव मोहम्मद अब्दुल शोएब असं आहे.

हैदराबादचा रहिवासी शोएब बसमध्ये चालकाच्या अगदी मागे बसला होता, त्यामुळे धडकेनंतर त्याला स्वतःचे प्राण वाचवणं सोपं झालं आणि तो वाचला. शोएब अविवाहित आहे आणि हैदराबादमध्ये त्याचा छोटासा व्यवसाय आहे. तो त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा आहे आणि उमराहसाठी पहिल्यांदाच सौदी अरेबियाला जात होता. अपघातानंतर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शोएब याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब अत्यंत शांत आणि धर्मिक स्वभावाचा तरुण आहे. मक्का – मदिना ही यात्र त्याचं एक स्वप्न होत. ज्यासाठी तो गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत होता. रविवारी रात्री सौदी अरेबियात पोहोचल्यानंतर शोएबने त्याच्या कुटुंबाला शेवटचा फोन केला आणि त्यांना कळवलं की तो मक्का सोडून मदीनाला जात आहे आणि काही तासांतच या दुर्घटनेची बातमी आली आणि संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

कसा झाला अपघात?

रिपोर्टनुसार, बसमध्ये जवळसास 46 यात्रेकरु होते. सोमवारी जवळपास 1.30 वाजता बस एका डिझेलच्या ट्रँकरला धडकली आणि मोठा अपघात झाल. काही क्षणात संपूर्ण बसला आग लागली. यावेळी अनेक यात्रेकरु तर झोपेत होते. अशात बसला भीषण आग लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. प्राथमिक माहितीनुसार, शोएब पुढच्या सीटवर बसला असल्याने तो वाचला आणि आग लागल्यानंतर काही मिनिटांतच जवळच्या प्रवाशांनी त्याला बाहेर काढले. त्याचं शरीर देखील खूप भाजलं आहे, परंतु डॉक्टरांच्या मते, त्याला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा दिल्या जात आहेत.

भारतीय कॉन्सुल जनरल आणि दूतावासाचे अधिकारी रुग्णालय आणि अपघातस्थळी उपस्थित आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

तर दुसरीकडे या दुःखद अपघातातून अब्दुल शोएबचा बचाव हा चमत्कारापेक्षा कमी नाही, परंतु त्याचा प्रवास अजूनही बराच लांब आहे; त्याला सखोल उपचार आवश्यकता असेल. त्याच्या कुटुंबाने प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याच आवाहन केलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.