AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Terrorism : पाकिस्तान नाही सुधारणार, इतका मार खाऊन पुन्हा तीच चूक, हा Photo बघा, सगळं समजेल

Pakistan Terrorism : पाकिस्तान कधीच सुधरु शकत नाही. एक फोटो समोर आलाय, त्यातून पाकिस्तानच सत्य पुन्हा एकदा समोर आलय. यौम-ए-तकबीरच्या निमित्ताने एका कार्यक्रमाच आयोजन झालं.या दिवशी 1998 साली पाकिस्तानने बलूचिस्तानच्या चगाई येथे अणूबॉम्बची चाचणी केली होती.

Pakistan Terrorism : पाकिस्तान नाही सुधारणार, इतका मार खाऊन पुन्हा तीच चूक, हा Photo बघा, सगळं समजेल
Pakistan Terror Network
| Updated on: May 30, 2025 | 3:03 PM
Share

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून जोरदार मार खाऊनही पाकिस्तान अजून सुधरत नाहीय. पाकिस्तानने पुन्हा एकदा स्टेट स्पॉन्सर टेररचे आरोप सिद्ध केले आहेत. पाकिस्तानातून एक नवीन फोटो समोर आलाय, त्यात लष्करचे दहशतवादी आणि शहबाज शरीफ यांचे मंत्री एका स्टेजवर एकत्र दिसतायत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात 28 मे रोजी यौम-ए-तकबीरच्या निमित्ताने एका कार्यक्रमाच आयोजन झालं. या दिवशी 1998 साली पाकिस्तानने बलूचिस्तानच्या चगाई येथे अणूबॉम्बची चाचणी केली होती. पाकिस्तान अणवस्त्र संपन्न देश बनला होता. यौम-ए-तकबीरच्या या कार्यक्रमात लष्करच्या खतरनाक दहशतवाद्यांसह शहबाज शरीफ यांचे मंत्री एका मंचावर उपस्थित होते.

पाकिस्तानचे खाद्य मंत्री मलिक राशिद अहमद खान आणि पंजाब असेंबलीचे स्पीकर मलिक मुहम्मद अहमद खान, लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्लाह कसूरी, हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद आणि आमिर हमजा शेजारी-शेजारी बसले होते. हे दोन्ही मंत्री पंतप्रधान शहबाज यांचे निकटवर्तीय मानले जातात.

या मंत्र्यांकडून स्टेजवर दहशतवाद्यांचे स्वागत

या कार्यक्रमात दहशतवादाच उदात्तीकरण करण्यात आलं. भारताविरोधात चिथावणीखोर भाषणं देण्यात आली. दहशतवाद्यांपासून अंतर ठेवण्याऐवजी शहबाज यांचे हे मंत्री स्टेजवर दहशतवाद्यांचा स्वागत करत होते, त्यांची गळाभेट घेतली. पाकिस्तानच्या संरक्षणात या दहशतवाद्यांच्या भूमिकेच कौतुक केलं.

सैफुल्लाह कसुरीची उपस्थिती

शहबाज यांचे मंत्री मलिक राशिद यांनी खुलेआम घोषणा केली की, पाकिस्तानच्या 24 कोटी लोकांच प्रतिनिधीत्व हाफिज सईद आणि सैफुल्लाह कसूरीसारखे लोक करतात. या कार्यक्रमात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसुरीची उपस्थिती हैराण करणारी होती.

खलिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी

कसूरी पहलगाम हल्ल्यानंतर अंडरग्राऊंड झाला होता. कसूरी 24 मिनिटांच द्वेषपूर्ण भाषण केलं. तो छाती फुगवून बोलत होता, पहलगाम हल्ल्यासाठी मला जबाबदार धरण्यात आलं, आता सगळ्या जगाला माझं नाव माहित आहे. यावेळी लश्कर-ए-तैयबाचा सहसंस्थापक आमिर हमजाने खलिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजी केली. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो आणि व्हिडिओमधून ISI आणि लश्करच्या प्रोपेगेंडाच्या संबंधांची पुष्टि होते.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.