AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशातील हिंसाचारामागे ‘या’ देशाचा हात, शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर आरोप

Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांना ज्या प्रकारे देश सोडावा लागला ती परिस्थिती कोणावर ही येऊ नये. पण यामागे कोणाचा तरी हात आहे अशी शंका शेख हसीना यांच्या मुलाने उपस्थित केली आहे. बांगलादेशमधील आंदोलन भ़डतवण्यामागे कोणाचा हात आहे यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बांगलादेशातील हिंसाचारामागे 'या' देशाचा हात, शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर आरोप
shailesh musale
shailesh musale | Updated on: Aug 09, 2024 | 4:56 PM
Share

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक आंदोलनानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी देश ही सोडावा लागला. यानंतर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं आहे. यादरम्यान शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी बांगलादेशातील हिंसाचार आणि सत्तापालट कशामुळे झाला याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, काही गट आंदोलकांना भडकवत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आमच्या सरकारने दोन-तीन वर्षांपूर्वी आरक्षणाचा कोटा काढला होता, पण स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय न्यायालयात पोहोचले होते, त्यामुळे आंदोलने सुरू झाली. हा एक छोटासा निषेध होता, परंतु पाश्चात्य गटांनी त्यांना भडकवले. ज्यामुळे आंदोलन हिंसक झाले आणि माझ्या आईच्या सुरक्षिततेचा मुद्दा तयार झाला. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत होते. माझ्या आईला शेवटच्या क्षणीही देश सोडायचा नव्हता. ती मिलिटरी एअरबेसवर गेली तेव्हा ती तिच्या बहिणीला म्हणाली की तिला जायचे नाही, पण तू जर गेली नाही तर हे लोकं तिला मारतील असं सांगितल्यानंतर ती तयार झाली.

आंदोलनामागे कोणाचा हात?

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाश्चात्य गटांचा या आंदोलनामागे सहभाग असल्याचा संशय आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, चीनचा यात सहभाग आहे असे मला वाटत नाही, कारण तो कधीही आमच्या अंतर्गत बाबींमध्ये गुंतलेला नाही. आम्ही प्रत्येक देशाचे मित्र होतो. चीन आणि भारताशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही भारताला आमचा चांगला मित्र मानतो. अमेरिकेशीही आमचे चांगले संबंध होते, पण पाकिस्तान (ISI) नेहमीच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या विरोधात राहिला आहे. आम्ही त्यांच्यापासून स्वातंत्र्यासाठी लढलो, म्हणून मला शंका आहे की विरोध भडकावण्यात आयएसआयचा हात होता.

विद्यार्थ्यांकडे बंदुका कुठून आल्या?

आंदोलन शांततेत सुरू असताना या विद्यार्थ्यांकडे बंदुका कशा आणि कुठून आल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बंदुका हाती घेतल्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर केला. यानंतरही आमच्या सरकारने त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले, मात्र हा संपूर्ण प्रकार चिथावणी देण्यासाठी रचण्यात आला होता. निदर्शने वाढत गेली आणि त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी बंदुकांसह पोलीस ठाण्यांवर हल्ला केला. त्यांच्याकडे बंदुका कुठून आल्या? हा मोठा प्रश्न आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...