Video | फुटबॉलच्या मॅचमध्ये अंदाधुंद गोळीबार, मैदानावर झोपून खेळाडूंनी वाचवला जीव, थरार कॅमेऱ्यात कैद

अमेरिकेतील अलाबामा येथे फुटबॉल सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडलीय. या गोळीबारात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

Video | फुटबॉलच्या मॅचमध्ये अंदाधुंद गोळीबार, मैदानावर झोपून खेळाडूंनी वाचवला जीव, थरार कॅमेऱ्यात कैद
US Football Match firing


नवी दिल्ली: अमेरिकेतील अलाबामा येथे फुटबॉल सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडलीय. या गोळीबारात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील असून तिथं एका अज्ञात हल्लेखोराने फुटबॉल स्टेडियमवर गोळीबार केला. अलाबामाच्या मोबाईल शहरातील लाड पिबल्स स्टेडियमवर रात्री उशिरा दोन हायस्कूल संघांमध्ये फुटबॉल सामना खेळला जात होता, त्या दरम्यान गोळीबार झाल्यानं अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

गोळीबार झाल्यानं मैदानावर गोंधळ

हल्लेखोराने गोळीबार सुरू केला तेव्हा ही मॅच संपणार होती. गोळीबारामुळं स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गोळ्यांचा आवाज ऐकून खेळाडूही आपला जीव वाचवण्यासाठी धावू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही खेळाडू आपला जीव वाचवण्यासाठी मैदानावर आडवे पडले.

मोठा कट असल्याचा पोलिसांना संशय

पोलिसांकडून या हल्ल्यामागे अनेक लोकांचा हात असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोणीही गोळ्या झाडल्या तरी त्यामागे एक व्यक्ती नाही, यामागे अनेक लोक असल्याचा संशय पोलिसांना आहे. या स्टेडियममध्ये अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही या स्टेडियमवर गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी 9 लोक जखमी झाले होते. यानंतर 17 वर्षांच्या मुलाने गोळीबार प्रकरणी आत्मसमर्पण केले होते.

इतर बातम्या:

अजित पवार यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली की बहिणीशी बेईमानी केली? किरीट सोमय्यांचा सवाल

पुणे, नाशिकनंतर आता राज ठाकरेंनी मुंबईकडे मोर्चा वळवला, भांडुपमध्ये मनसेचा मेळावा होणार

VIDEO | राज ठाकरेंना वॉचमननं ओळखलं नाही म्हणून मारहाण? काहींना अटक, नेमकं प्रकरण काय?

shooting at an Alabama high school football game on Friday night wounded four people video viral on social media

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI