AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमान 37 हजार फूट उंचावर असताना बसले जोरदार हादरे, ‘एअर टर्बुलन्स’ मध्ये सापडल्याने इमर्जन्सी लॅंडींग, एकाचा मृत्यू

विमानाची उंची कमी करताना प्रवाशांना सीट बेल्ट लावण्याचा इशारा देण्यात आला नाही. अनेक प्रवाशांनी त्यांच्या जागेवरून उडाले. प्रवाशांचे डोके लगेड कंटेनरवर आदळले. अनेकांना दुखापत झाली. एका प्रवाशाचा मृत्यू झाला.

विमान 37 हजार फूट उंचावर असताना बसले जोरदार हादरे, 'एअर टर्बुलन्स' मध्ये सापडल्याने इमर्जन्सी लॅंडींग, एकाचा मृत्यू
AIR PLANE Image Credit source: TV9MARATHI
Updated on: May 21, 2024 | 8:35 PM
Share

सिंगापूर एअरलाईन्सचे बोईंग 777-300ER हे विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन उड्डाण घेत निघाले खरे, परंतू म्यानमार जवळ ते आकाशातील हवेच्या निर्वांत पोकळीत अडकल्याने ( एअर टर्बुलन्स ) विमानाला जोरदार झटके बसु लागल्याने प्रवाशांची अवस्था बिकट झाली. भारतीय वेळेप्रमाणे रात्री 2.45 वाजता या विमानाने लंडनच्या हिथ्रो विमान तळावरुन सिंगापूरसाठी उड्डाण घेतले होते. या विमानाला अवकाशातील अपवादात्मक ‘एअर टर्बुलन्स’ परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने त्याला मार्ग वळवून बॅंकॉकला उतरविले. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

सिंगापूर एअरलाईन्सचे फ्लाईट 21 मे रोजी म्यानमारच्या आकाशात ‘एअर टर्बुलन्स’ मध्ये अडकले. अचानक विमान आकाशात झोकांड्या खाऊ लागल्याने 73 वर्षीय ब्रिटीश प्रवाशाचा मृत्यू झाला. तर 30 प्रवासी जखमी झाले. लंडन हून हे विमान सिंगापूरला जात होते. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरुन टेक ऑफ घेतल्यानंतर अकरा तासांनी विमान ( म्यानमार  )  ब्रह्मदेशाच्या हवाई हद्दीतच 37 हजार फूटांवर वाईट हवामानामुळे एअर टर्बुलन्समध्ये अडकले. त्यामुळे अफरातफरी माजली. विमानातील वस्तू इकडे तिकडे उडू लागल्या. विमानाला अनेक झटके बसले. त्यानंतर पाच मिनिटांत विमान 37 हजार फूट उंचावरुन 31 हजार फूटांवर आले. यावेळी उंचावरुन खाली आणताना प्रवाशांना सीट बेल्ट लावण्याचा सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक प्रवासी आपल्या सीटवरुन उचलेले जाऊन छताला धडकले. त्यांचे डोके लगेज कंटेनरला धडकून ते जखमी झाले. त्यात एका ज्येष्ठ प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विमानात 211 प्रवासी होते

भारतीय वेळेनूसार या विमानाला दुपारी 2.15 वाजता, बॅंकॉकला वळविण्यात आले. तेथील सुवर्णभूमी विमानतळावर त्याची इमर्जन्सी लॅंडींग करण्यात आली. हे विमान दुपारी 3.40 वाजता सिंगापूरला लॅंड होणार होते. विमानाला बसलेल्या निर्वात पोकळीच्या झटक्यामुळे विमानाचे छत काही ठिकाणी कोसळले आहे. अशा प्रकारच्या हवामानाच्या परिस्थितीचा विमान प्रवासात अपवादात्मक परिस्थितीत सामना करावा लागतो. या विमानात एकूण 211 प्रवासी आणि 18 क्रु मेंबर होते. सिंगापूरच्या चांगी एअर पोर्टवर या विमानाला उतरायचे होते. परंतू बॅंकॉकला त्याची इमर्जन्सी लॅंडींग झाली.

अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो
अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो.
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे
पक्षाचं नाव कोणत्याही येड्या गबाळ्याला द्यायचं हे.., - उद्धव ठाकरे.
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार
महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा येणार.
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप
आरोपीला व्हीआयपी ट्रि्टमेंट मिळतेय; प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप.
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली
चड्डी-बनियानने अधिवेशन गाजवलं! आदित्य ठाकरे-नीलेश राणेंमध्ये जुंपली.
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल
पैशांची खूप मस्ती आली का? तुला..; भाजप आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल.
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका
चड्डी, बनियन गँग उघडी-नागडी फिरतेय, त्यांना..; अनिल परबांची टीका.
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा
परमीट रुम्स, बार बंद, ड्राय डेमुळे तळीरामांचा वांधा.
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
जयंत पाटलांनी राजीनामा दिला नाही? सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा.
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
सुप्रीम कोर्टाकडून उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा.