काबूल : अफगाणिस्तानमध्ये अजून तालिबानचं सरकार अस्तित्वात आलेलं नाही. पण त्याआधीच अफगाण लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. त्यातही अफगाण महिला तालिबान्यांच्याविरोधात रस्त्यावर पुन्हा पुन्हा उतरतायत. त्यांना उत्तर म्हणून तालिबानी बंदुकीचा आधार घेतायत. आजही राजधानी काबूलमध्ये तालिबानच्याविरोधात एक मोठा मोर्चा निघाला. ह्या मोर्चात महिलांचं प्रमाण मोठं होतं. मोर्चात सहभागी झालेल्या अफगाण जनतेनं तालिबान मुर्दाबादचे नारे दिले. विशेष म्हणजे ह्या मोर्चात पाकिस्तानच्या बरबादीसाठी दुवा मागितली गेली.