AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे आहेत बेपत्ता; आता कशी होणार राष्ट्रपती पदाची निवड; 4 प्रश्नांमध्ये जाणून घ्या

या सर्व परिस्थितीमुळे श्रीलंकेत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेत आता राष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंकेत राष्ट्रपती पदावर जर कोणाची नेमणूक करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी असणार आहे, त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Sri lanka Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे आहेत बेपत्ता; आता कशी होणार राष्ट्रपती पदाची निवड; 4 प्रश्नांमध्ये जाणून घ्या
श्रीलंकेप्रमाणे 9 देश अराजकाच्या दिशेने
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jul 10, 2022 | 7:51 PM
Share

नवी दिल्लीः श्रीलंकेतील आर्थिक संकटाने आता भयानक रूप धारण केले आहे. श्रीलंकेत आंदोलकांचा रोष प्रचंड वाढला असून आता त्यांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे  (President Gotabaya Rajapaksa) 5 जुलैपासून बेपत्ता आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोटाबाया सुटकेससह बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Prime Minister Ranil Wickremesinghe) यांच्या मालकीच्या घरावरही आंदोलकांनी हल्ला चढविला असून त्यांचे ते खासगी घरही जाळण्यात आले आहे.

श्रीलंकेच्या संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे की ते आता श्रीलंकेचे कार्यवाहक म्हणून राष्ट्रपती काम पाहणार आहेत. तसेच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना सभापतींकडून पायउतार होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी अध्यक्ष गोटाबाया यांना 13 जुलै रोजी राजीनामा देण्यासही सांगण्यात आले आहे.

श्रीलंकेत राजकीय पोकळी

या सर्व परिस्थितीमुळे श्रीलंकेत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेत आता राष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीलंकेत राष्ट्रपती पदावर जर कोणाची नेमणूक करायची असेल तर त्याची प्रक्रिया कशी असणार आहे, त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

प्रश्न 1: राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेचे संविधान काय म्हणते?

श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतीने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यास, संसद आपल्या कोणत्याही सदस्याला राष्ट्रपती म्हणून नियुक्त करू शकते असं श्रीलंकेच्या संविधानामध्ये म्हटले आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष उर्वरित कार्यकाळासाठी पदावर राहू शकतात.

दुसरा प्रश्न: राष्ट्रपतींना पदावरून काढून टाकल्यानंतर किती दिवसांत अध्यक्षाची निवड करावी लागते?

राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर एक महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपती निवडला जाणे अपेक्षित आहे. तर 13 जुलै रोजी गोटाबाया यांनी राजीनामा दिल्यास श्रीलंकेला 13 ऑगस्टपर्यंत नवीन राष्ट्रपती पदावर नेमणूक करावी लागणार आहे.

तिसरा प्रश्न: नवीन राष्ट्रपती निवडण्याची प्रक्रिया काय आहे?

राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसांत संसदेची बैठक बोलवली जाते. त्यानंतर बैठकीत संसदेचे महासचिवांकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची माहिती संसदेला दिली जाते. अध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास, नवीन राष्ट्रपती गुप्त मतदानाद्वारे म्हणजेच पूर्ण बहुमताने निवडला जातो.

चौथा प्रश्न : नवा राष्ट्रपती निवडून येईपर्यंत देश कोण सांभाळणार?

श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान कार्यवाहक राष्ट्रपती होऊ शकतात, मात्र श्रीलंकेत रानिल विक्रमसिंघे यांनीही राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांना श्रीलंकेचे हंगामी राष्ट्रपती बनवण्यात आले आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत ते हे पद सांभाळणार आहेत.

Follow Us
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान