AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांचा पुन्हा एकदा दणका, कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय, थेट कौन्सिल..

अभिजीत दिपके यांनी नीट पेपरफुटीविरोधात मोठे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला यश मिळाले आणि थेट धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता अभिजीत दिपके यांनी मोठे आरोप केले.

अभिजीत दिपके यांचा पुन्हा एकदा दणका, कॉकरोच जनता पार्टीचा मोठा विजय, थेट कौन्सिल..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 14, 2026 | 11:31 AM
Share

अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने मोठे आंदोलन उभे केले. अभिजीत दिपके जंतर मंतरवर आंदोलनाला बसले होते. नीट पेपरफुटीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला झुकावे लागले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत कॉकरोच जनता पार्टीची पुढची भूमिका ठरली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ते लढा कायम ठेवणार आहेत. सध्या काही राजकीय निर्णय घेणार नसल्याचेही यादरम्यान त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यानच आता अभिजीत दिपके यांनी मोठे विधान केले. अभिजीत दिपके यांनी म्हटले की, ग्रामीण भागातील शाळांमधील सुविधांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत. मला खूप सारे व्हिडीओ येतात, विद्यार्थ्यांना दररोज सात सात किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जावे लागते.

NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या दीक्षांत समारंभासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना निमंत्रित करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला. विद्यार्थी याविरोधात उपोषणाला बसले. त्याविद्यार्थ्यांवर कारवाई करत वकील म्हणून नोंदणीपासून रोखण्याबाबतचा आदेश बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतले होते. मात्र, त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन करण्याचे सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

मोठा विजय सीजेपीचा झाला आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निर्णय एका तासात मागे घेण्यात आला. त्यांची तानाशाही सुरू होती. मात्र, आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला. यांची ताणाशाही कोणीही सहन करणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवण्यात आले. एका तासात त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यावरून मला आता वाटते की, सरकार आता कुठे ना कुठे समजायला लागली आहे की, ही तानाशाही आता कुठे ना कुठे चालणार नाही.

सरकार हुकुमशाहा पण जनता सहन करणार नाही. यासोबत दिल्लीत सीजेपीला कोणीही हॉल देत नसल्याचेही अभिजीत दिपके यांनी म्हटले. त्यांना तश्या धमक्या दिल्या जात आहेत. अभिजीत दिपके सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्याकडून सतत पोस्ट शेअर केल्या जात आहेत. अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार टीका केली.

Follow Us
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद