Sunita Williams Return : Starliner यानामुळे सुनीता विलियम्स यांना वनवास, 9 महिने अडकल्या अंतराळात, आता Boeing कंपनीचे भविष्य काय?
Starliner Spacecraft Sunita Williams Return : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. त्यांच्या चेहर्यावरील हास्यच गेल्या 9 महिन्यांच्या संयमाचे प्रतिक आहे. पण यामुळे Starliner या अंतराळयानाच्या भवितव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह लागलं आहे.

अखेर भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्यांच्या चेहर्यावरील गोड हास्याने 9 महिन्यांच्या संयम दिसून आला. भारतीय वेळेनुसार आज भल्या पहाटे SpaceX च्या ड्रॅगन कॅप्सूलच्या माध्यमातून फ्लोरिडाच्या समुद्र किनार्यावर त्यांचं यशस्वी लँडिंग झाले. 5 जून 2024 रोजीपासून सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर हे दोघे बोईंग कंपनीच्या स्टारलाईनर या अंतराळ यानातून (Spacecraft) अंतराळासाठी रवाना झाले होते. 8 दिवसानंतर 13 जून 2024 रोजी त्या सहकार्यासोबत पृथ्वीवर परतणार होत्या. पण तांत्रिक बिघाड दुरूस्तच न झाल्याने या दोघांना 9 महिने स्पेस स्टेशनमध्येच अडकून पडावे लागले. त्यांच्या सुटकेचे या दरम्यान प्रयत्न झाले. पण त्यात यश आले नाही. बोईंगऐवजी जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने त्यांची अंतराळातून सुटका केली. त्यामुळे आता बोईंगच्या Starliner या अंतराळयानावरच नाही तर कंपनीच्या भवितव्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उभं ठाकलं आहे. ...