जगातला अजब आयलँड, फक्त बायकाच दिसणार, पुरुष आला की…पृथ्वीवरच्या स्वर्गाची सगळीकडे चर्चा!
या आयलँडवर फक्त महिलांनाच येण्याची परवानगी आहे. पुरुषांना तेथे येऊ दिले जात नाही. महिलांनी खुलेपणाने जगावे यासाठी आयलँडचा हा नियम आहे.

SuperShe Island : आज प्रत्येकजण आपल्या स्वप्नांसाठी धावतो आहे. धावपळ करून प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करतो. कामाचा थकवा घालवण्यासाठी अनेकजण कुठेतरी फिरायला जातात. दोन ते तीन दिवस फिरून पुन्हा एकदा लोक उत्साहाने कामावर परतात. या जगात महिलांचा थकवा घालवण्यासाठी एक खास आयलँड आहे. विशेष म्हणजे या आयलँडवर फक्त महिलांनाच एन्ट्री आहे. या आयलँडवर पुरुष दिसतच नाहीत. महिलांना त्यांचं स्वातंत्र्य पूर्णपणे उपभोगता यावं, यासाठी या आलँडमध्ये पुरुषांना येऊ दिले जात नाही. आता याच आयलँडची जगभरात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या आयलँडला ‘महिलांचा स्वर्ग’ असे म्हटले जात आहे.
महिलांनी खुलेपणाने जगावे म्हणून…
या आयलँडला सुपरशी (SuperShe Island) असेदेखील म्हटले जाते.बाल्टिक सागराच्या मधोमध एक 8.4 एकरचा प्रायव्हेट आयलँड आहे. हा आयलँड एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. या आयलँडवर महिलांव्यतिरिक्त अन्य कोणालाही येण्यास मनाई आहे. सामाजिक दबावाला बळी न बडता महिलांनी खुलेपणाने जगावे, आनंद लुटावा हा या आयलँडचा उद्देश होता. या आयलँडवर घनदाट जंगल आहे, पाणी आहे, आलिशान वुडन व्हिला आहे. प्रायव्हसी मिळावी म्हणून इथे एका बारमध्ये फक्त आठ महिलांना थांबू दिले होते. महिला येथे योगा, मेडिटेशन करायच्या. सागराच्या किनाऱ्यावर फिरण्याचीही तेथे संधी होती.
10 कोटी रुपयांना खरेदी केला आयलँड
SuperShe आयलँडच्या संकेतस्थळानुसार हा आयलँड पूर्व अमेरिकन क्रिस्टीन रोथ यांनी 2018 साली खरेदी केला होता. त्यांनीच महिलांना मुक्तपणे जगता यावे यासाठी नो मेन अलाऊड हे धोरण ठरवले होते. पुढे 2023 साली सुपरशी या आयलँडला देयान मिहोव यांनी साधारण 10 कोटी रुपयांना खरेदी केले. देयान मिहोन यांनीदेखील पुरुषांना बंदी असलेले हे धोरण कायम चालू ठेवले.
दरम्यान, या आयलँवर प्लबिंगचे तसेच इतर काही दुरुस्तीचे काम करण्यासाठीच पुरुषांना येऊ दिले जाते. पुरुषांचा कमीत कमी वावर असावा यासाठी तेथे सर्व कामांसाठी महिलांनाच संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांच्या स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येऊ नये यासाठी हा नियम पाळला जातो.
